कोल्हापुरात दिवसात कोरोनाचे 607 रुग्ण | पुढारी

कोल्हापुरात दिवसात कोरोनाचे 607 रुग्ण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात कोरोनाचे 607 रुग्ण आढळले असून, तिसर्‍या लाटेतील दिवसभरातील ही उच्चांकी रुग्णवाढ आहे. आज दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 427 पर्यंत पोहोचली असून, बुधवारी 222 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 239 इतकी आहे. शहरात 316 रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेतील रुग्णसंख्येचे प्रमाण कमी-जास्त होत असतानाच बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोल्हापुरात 607 रुग्ण आढळले. शहरातील सर्वाधिक 316 रुग्णांचा यात समावेश आहे. आरटी-पीसीआरच्या 1 हजार 371 चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 1 हजार 153 चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर 218 अहवाल पॉझिटिव्ह आले. अँटिजेन टेस्टच्या 360 अहवालांपैकी 268 अहवाल निगेटिव्ह, तर 91 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी लॅबमध्ये 426 अहवाल निगेटिव्ह व 298 अहवाल पॉझिटिव्ह आले.

  • allu arjun : अल्लू अर्जुनचा Ala Vaikunthapurramuloo येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर येथील 55 वर्षीय पुरुषाचा, तर करवीर तालुक्?यातील चिंचवाड येथील 46 वर्षीय महिलेचा बुधवारी कोरोनाने मृत्यू झाला. आजरा 3, भुदरगड 1, चंदगड 5, गडहिंग्लज 12, हातकणंगले 34, कागल 4, करवीर 95, पन्हाळा 10, राधानगरी 11, शाहूवाडी 6 आणि शिरोळ तालुक्यात 20 रुग्ण आढळले आहेत.

Back to top button