सिंधुदुर्ग : वेंगुर्ले येथील युवकाचा लेप्टोसदृश्य आजाराने मृत्यू

आरोग्य विभागाच्या वतीने परिसरात सर्व्हे करण्यात यावा, नागरिकांची मागणी
Sindhudurg Crime News
वेंगुर्ले येथील युवकाचा लेप्टोसदृश्य आजाराने मृत्यू झाला.
Published on: 
Updated on: 

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावडदेववाडी येथील रहिवासी केशव उर्फ मिथुन रामचंद्र ठाकूर (वय ३२) या युवकाचा मंगळवारी (दि. १९) रात्री ९ वाजता लेप्टोसदृश्य आजाराने मृत्यू झाला.

केशव ठाकूर याला मंगळवारी नातेवाईकांनी कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला लेप्टोची सुरुवात झाल्याचे वैद्यकीय रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, मंगळवारी रात्री अचानक त्याची तब्येत खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. तरूण मुलाच्या मृत्यूमुळे मठ गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान लेप्टोसदृश्य आजाराने झालेल्या तरूणाच्या मृत्यूमुळे परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने त्वरित सर्व्हे करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news