कसाल : मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे सर्व्हिस रोडवरून कणकवलीच्या दिशेने जाणार्या मालवण-कोल्हापूर एसटी बसची उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक बसून अपघात घडला. यात 26 प्रवासी जखमी झाले. कसाल येथील खासगी हॉस्पिटलमध्ये काही प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून उर्वरित प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी 8 वा. च्या सुमारास हा अपघात घडला.
मालवण डेपोची मालवण-कोल्हापूर बस कसाल बसस्थानकातून प्रवाशांना घेऊन पुढे सर्व्हिस रोडने कणकवलीच्या दिशेने मुख्य रस्त्यावर बाहेर पडत असताना, महामार्गावर कणकवलीच्या दिशेने उभ्या असलेल्या कंटेनरला एसटी बसची पाठीमागून जोरदार धडक बसली. या धडकेत बसच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले. एसटी चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघाच घडल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.अपघातानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांनी एसटीतील प्रवाशांना बाहेर काढत कसाल येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे : एसटी कंडक्टर संतोष रामकृष्ण मांजरेकर (57, रा. मालवण), विजया विष्णू गावडे (60, रा. नांदोस), प्रियांका नीलेश दूधवडकर (32, रा. दांडी-मालवण), त्रिशा नीलेश दुधवडकर (9), पराग रवींद्र माने (50, रा. गवंडीवाडा मालवण), योगेश दत्ताराम सुर्वे (38, रा. मालवण), भक्ती भगवान नकाशे (44, रा.आंब्रड), चिमणा चंद्रकांत भाबल (29, रा. तिर्लोट,देवगड), सुषमा भिवा वांयगणकर (10, वायंगणी),स्नेहलता सूर्यकांत केरकर (64, रा. मसुरे), राजाराम साबजी पार्टे, अनिता अरुण घाडीगावकर (59, रा. कुसबे), वीरेंद्र पंढरीनाथ भगत (46, रा. कसाल), श्रीकृष्ण भगवान मिस्त्री (42, रा. कसाल), लावंण्या राहुल अपराज (44), धनिका मारुती शिंदे (22, रा. कसाल), रवींद्र तुकाराम सुतार (75, रा. कुणकवळे), नयना नारायण वालावलकर (55, रा. सुकळवाड), शुभांगी श्रीकृष्ण मेस्त्री, चेतन दयानंद सुतार (24, रा. कुणकवळे), श्रद्धा रघुनाथ सुतार (36, रा.कुणकवळे), रघुनाथ रवींद्र सुतार (40, रा. कुणकवळे), पवन रवींद्र माने (10, रा. मालवण), धनश्री धनाजी नाईक (45, रा.पोईप), धनश्री दिगंबर नाईक (52, रा. पोईप), विजया विष्णू गावडे (60, रा. नांदोस मालवण).