सिंधुदुर्ग : नारुर महालक्ष्मी मंदिरात 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Narur Mahalakshmi Temple
नारुर महालक्ष्मी मंदिर
Published on
Updated on

कुडाळ : नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात 3 ते 12 ऑक्टोबर कालावधीत नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधींसह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मासानंतर सर्वात जास्त दिवस साजरा करण्यात येणार उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. 3 ते 12 ऑक्टोबर कालावधीत विविध धार्मिक विधी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 3 रोजी सकाळी 9 वा. घटस्थापना होईल. त्यानंतर विविध धार्मिक विधी होतील. तसेच 3 ते 7 ऑक्टोबर कालावधीत रोज सायंकाळी 7.30 वा. ह.भ.प.श्री. मेस्त्री बुवा, कालेली यांची कीर्तने होणार आहेत. यात 3 रोजी सायं. 7.30 वा. दुर्गा-मधुकैठब वध या विषयावर कीर्तन होणार आहे. 4 रोजी कृष्ण-रुक्मिणी स्वयंवर, 5 रोजी राम-रामभक्त केवट, 6 रोजी संतचरित्र-संत गोरा कुंभार, 7 रोजी ऐतिहासिक-अफझलखान वध, अशी कीर्तने होणार आहेत.

8 व 9 रोजी जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धा होणार अहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक 7001 रु., द्वितीय क्रमांक 5777 रु., तृतीय क्रमांक 3777 रु. तर उत्तेजनार्थ 2777 रु. व इतर वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. 10 रोजी सायं. 7 वा. पासून श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक गोंधळ व जागरण कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वा. महाप्रसाद, 11 रोजी सायंकाळी 7.30 वा. स्थानिक गावातील सर्व शाळा आणि अंगणवाडीतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम महालक्ष्मी सभामंडपात सादर होणार आहेत. 12 रोजी दुपारी 2 वा. सिमोल्लंघन होणार आहे. त्यानंतर रात्री 9.30 वा. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री देव कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचे दशावतारी नाटक होईल. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी महालक्ष्मी देवस्थान समिती व नारुर ग्रामस्थांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news