Water crisis | न. पं. स्थापनेला आठ वर्षे होऊनही पाण्याचा प्रश्न का सुटेना

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून देवगड- जामसंडेतील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
Water crisis
देवगड -जामसंडे न.पं. pudhari photo
Published on
Updated on

देवगड ः देवगड -जामसंडे शहर व्हॉटसअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांकडून न.पं.कार्यक्षेत्रातील पाणी, कचरा, सांडपाणी, मोकाट गुरे, स्ट्रीटलाईट आदी समस्यांचा पाढा वाचला जात आहे. देवगड -जामसंडे न.पं. ची स्थापना होवून आठ वर्षे झाली तरी पाणीपुरवठ्या सारखा महत्वाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही.शहरातील अन्य नागरी समस्याही तश्याच आहेत, अशा आशयाच्या अनेक पोस्ट व्हॉटसपग्रुपवर टाकत नागरिकांनी आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

शहरातील पाणी व कचरा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून सतत फुटणार्‍या पाईपलाईनमुळे वरचेवर बंद होणारा पाणीपुरवठ्याची समस्याही सोडविण्यावर भर देण्यात आला आहे. ळयोजना दुरूस्तीसाठी 9 कोटी 21 लाख रूपये मंजुर असून त्याची वर्कऑर्डर येत्या दोन दिवसात निघेल व कामाला तात्काळ सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती न.पं.प्रशासनाकडून देण्यात आली.

देवगड- जामसंडे न.पं.स्थापन होवून आठ वर्षे उलटली आहेत. तरीही शहरातील मूलभूत समस्या आजही कायम आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी बनलेला पाणीप्रश्न आजही कायम आहे. किंबहुणा ताक आणखी जटील बनला आहे.

या शिवाय शहरातील साडंपाणी व्यवस्थापन, कचरा डंपीग व प्रक्रिया, वाहतूक कोंडी आदी समस्याही कायम आहेत. नगरपंचायत निर्मितीमुळे या समस्या कायमच्या मार्गी लागतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र आठ वर्षे झाली तरी प्रश्न कायम असल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे.

यामुळे संतप्त नागरिकांनी शहरातील समस्यांबाबतच्या आपल्या भावना न. पं. च्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर मांडण्यास सुरूवात केली आहे. न.पं.क्षेत्रातील नागरी समस्या जनतेला सहजपणे मांडता याव्यात, यासाठी हा देवगड -जामसंडे शहर नगरपंचायत व्हॉटसअ‍ॅप ग्रुप बनविण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये देवगड जामसंडेमधील नागरिक, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक, न. पं. अधिकारी,कर्मचारी यांना समाविष्ट करण्यात आले आहे.

सध्या या ग्रुपवर समस्यांचाच पाढा वाचला जात असून नागरिक समस्यांबाबतच्या भावना व्यक्त करत आहेत.त् यातील काही समस्यांचे निराकरण करण्यात आले. मात्र ऐन पावसाळ्यातही वारंवार फुटणारी पाईपलाईन व यामुळे वरचेवर बंद पडणारा पाणीपुरवठा. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी पाणीप्रश्नावर नगरसेवक व प्रशासनाला या ग्रुपच्या माध्यमातून धारेवर धरले आहे.

देवगड-जामसंडेसाठी कोर्ले-सातंडी येथून स्वतंत्र नळयोजना प्रस्तावित आहे. मात्र ही योजना होण्यास अजून बराच कालावधी जाईल, सध्यस्थितीत देवगड-जामसंडेमधील जनतेला पाणीपुरवठा करणार्‍या दहिबांव अन्नपूर्णा नदीवरील योजनेची अवस्था गंभीर झाल्याने पाण्याचा प्रश्न वारंवार गंभीर बनत आहे. हा प्रश्न गंभीर बनण्यासाठी कारणीभूत ठरत आहे ती जीर्ण पाईपलाईन, जुनी झालेली व वारंवार नादुरूस्त होत असलेली पंपींग यंत्रणा. पाईपलाईन बदलणे व पंपींग यंत्रणा नवीन बसविणे गरजेचे आहे.

ही योजना दुरूस्तीसाठी 9 कोटी 21 लाखाचा निधी मंजुर झाला आहे. हे काम टेंडर प्रक्रियेत होते. येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होवून कामाला सुरूवात होईल अशी माहिती न.पं.प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र हे काम पूर्ण होण्यास अवधी लागेल. तरीही पाईपलाईन, पंपींग यंत्रणेचे काम लवकरच पूर्ण करण्यावर भर असेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कचरा, मोकाट गुरे, सांडपाणी हे प्रश्न गंभीर आहेत.नागरिकांनी या प्रश्नावरही भावना व्यक्त केल्या आहेत.नागरिकांच्या भावना तीव्र बनल्या आहेत.कचरा डंपीग जागाही शोधणे सुरू असून कचरा डंपिंग जागा व कोंडवाडा हा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल असे सांगण्यात येत आहे.

लाखो रूपये खर्चाची वॉटर एटीएम् सुरूच झाली नाहीत

देवगड व जामसंडे शहरात पाच वर्षापूर्वी लाखो रूपये खर्च करून वॉटर एटीएम् उभारण्यात आले. मात्र ते तसेच पडून आहे. त्यावर लाखो रूपये खर्च करूनही ते सुरू न झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत नगरसेवकांनी सभेमध्येही प्रश्न उपस्थित केला तरीही तो प्रश्न जैसे थे आहे.

न.पं.स्थापन होवून आठ वर्षे होवून गेली.न.पं.ची ही दुसरी टर्म सुरू आहे. मात्र ना पहिल्या टर्ममध्ये पाण्यासारखे महत्वाचे प्रश्न कायमस्वरूपी सुटले, आता दुसर्‍या टर्मच्या सत्तेला साडेतीन वर्षे होवून गेली अद्याप पाण्याचा प्रश्न कायम आहे.

यामुळे नागरिकांच्या या प्रश्नांबाबत असलेल्या भावना त्यांनी व्हॉटसप ग्रुपद्वारे मांडून लोकप्रतिनिधी, नगरसेवक त्याचबरोबर न.पं.प्रशासन यांचेही लक्ष वेधले असून हे प्रश्न लवकरच सुटावेत अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे.

देवगड-जामसंडे शहरातील पाण्यासारखे महत्वाचे प्रश्न मागील सत्ताधार्‍यांपासून तसेच आहेत.आपण नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर हे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र विरोधकांकडून कायम अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला. नागरिक व्हॉटसप ग्रुपच्या माध्यमातून हे प्रश्न मांडत आहेत.हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून पाण्यासारखा महत्वाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

साक्षी प्रभू, नगराध्यक्षा- देवगड न. पं.

न.पं.कार्यक्षेत्रीतील मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.पाणीप्रश्न तसेच कचरा प्रश्न सोडविण्यावर भर आहे.कचरा डंपींगसाठी जागा पाहण्याचे काम सुरूच असून कचरा डेपो व कोंडवाडा याचा प्रश्न लवकरच सुटेल.

शरद ठुकरूल, गटनेते तथा न.पं.बांधकाम सभापती

देवगड-जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या दहिबांव येथील पुरक नळयोजनेच्या दुरूस्तीसाठी 9 कोटी 21 लाखाचा निधी मंजूर झाला असून या कामाची वर्कऑर्डर येत्या दोन दिवसात होईल व कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल.कचरा डंपींग साठी जागा पाहण्याचे काम सुरू आहे.

सूरज कांबळे, मुख्याधिकारी- देवगड न. पं.

व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून न.पं.कार्यक्षेत्रातील समस्यांबाबत नागरिक आपल्या भावना मांडत आहेत.हेच प्रश्न आम्ही न.पं.च्या प्रत्येक सभांमध्ये मांडत आहोत मात्र ते मार्गी न लागल्याने जनतेचा उद्रेक झाला आहे व आपल्या तीव्र भावना ग्रुपच्या माध्यमातून मांडत आहेत.

नितीन बांदेकर, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news