सिंधुदुर्ग : वैभववाडीला पावसाने झोडपले

दरड कोसळल्याने कोल्हापुरकडे जाणारी वाहतुक बंद
Rain lashed Vaibhavwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊसFile Photo
Published on
Updated on

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात सोमवारी (दि.23) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. भुईबावडा व करूळ या सह्याद्री पाट्ट्यात तर ढग फुटी सदृश्य पाऊस कोसळल्यामुळे भुईबावडा घाटात दोन ठिकाणी मोठी दरड कोसळली आहे. त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसल्यामुळे घाटात एसटी बससह अन्य वाहने अडकून पडली आहेत. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत . घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस व घाटात सार्वजनिक बांधकामचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.

Rain lashed Vaibhavwadi
Rain Update | येत्या २४ तासात राज्यातील सर्वच भागांत मुसळधार पाऊस

सोमवारी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यातील करुळ, भुईबावडा व इतर गावात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने भुईबावाडा घाटात नाल्याचे स्वरूप आले. तर दोन ठिकाणी मोठया दरडी कोसळ्यामुळे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे . माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. मात्र तोपर्यंत काळोख झाल्यामुळे मार्ग मोकळा करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे घाटात दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Rain lashed Vaibhavwadi
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; घोडाझरी पुन्हा ओव्हरफ्लो

करूळ येथे झालेल्या ढग सदृश्य पावसाने अक्षरशः हाहाकार उडवून दिला. गावातून वाहणाऱ्या नद्याना महापूर आला आहे. तर अनेक कालवे पाण्याखाली गेल्याने वाड्यांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी घाट मार्गात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. करुळ घाट वाहतुकीला बंद आहे. या घाटात देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.नदी काठाच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी व ओहळाच्या   काठावर असलेले भात शेती ही जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, श्री जायभाय, सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरडवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे या कामात अडथळा येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news