कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे दाखल केला. यानिमित्त कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी रॅली काढण्यात आली.
भाजप नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सौ. नीलम राणे, नीलेश राणे, सौ. नंदिता राणे, सौ. प्रियंका राणे, कु. अभिराज राणे, कु. निमिष राणे, माजी आ. प्रमोद जठार, अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्यांतील महायुतीचे कार्यकर्ते सकाळपासूनच मोठ्या संख्येने कणकवलीत दाखल झाले होते. गांगो मंदिर ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत महायुतीच्या पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. प्रारंभी श्रीदेव गांगो मंदिरात श्रीफळ वाढवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
रॅलीमध्ये माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, भाजपचे विधानसभाप्रमुख मनोज रावराणे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी जि.प. उपाध्यक्ष आरिफ बगदादी, देवगड तालुकाध्यक्ष राजू शेट्ये, अमित साटम, दया पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर या सर्वांमुळे मला कुडाळ विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची संधी मिळाली. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. या निवडणुकीत वडील श्री. नारायण राणे यांनी सांगितल्याप्रमाणे मी या मतदारसंघात किती लीड घेवून विजयी होईन हे मी सांगू शकत नाही. मताधिक्याचे गणित हे मी सर्व माझ्या जनतेवर सोडलेले आहे. जनता मला किती मताधिक्य देईल हे येत्या २३ नोव्हेंबरला समजेल असा विश्वास व्यक्त केला.
भाजप नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काका कुडाळकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रमोद जठार, सौ. प्रियांका राणे, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, बबन शिंदे, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, माजी जि. प. अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, चिटणीस विनायक राणे, राजू राऊळ, अशोक सावंत, आनंद शिरवलकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, जिल्हा बँक संचालक बाबा परब, अस्मिता बांदेकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, आर. के. सावंत,
जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, रवीकिरण तोरस्कर, सौ. अदिती सावंत आदी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज शांततेत तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कुडाळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निलेश राणे यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कोणतीही रॅली, सभेचे नियोजन केले नाही तरीसुध्दा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसिलच्या बाहेर पक्षाचे झेंडे हाती घेत मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांनी निलेश राणे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जमलेल्या गर्दीला महिला बालरूग्णालय जवळच पोलिसांनी रोखून धरले. यावेळी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या संख्येने उपस्थित होता.