

राजापूर: मुंबई - गोवा महामार्गावर एका महिलेला लिप्ट देऊन तिच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून लुबाडण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या त्या कार चालकाचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. तब्बल दोन दिवस उलटूनही या प्रकरणातील कार व त्या चालकाचा शोध न लागल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, महिलेने केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र तयार करुन त्या दृष्टीने तपास सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.
पोलिसांनी तपास करण्यासाठी वेगवेगळया चार टिम तयार केल्या आहेत. मात्र या प्रकारानंतर राजापुरात महिलांमध्ये काहीसे भितीचे वातावरण आहे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दसर्याच्या दिवशी महामार्गावर कोदवली येथून राजापूरकडे येणार्या रश्मी प्रभाकर चव्हाण या 65 वर्षीय महिलेला राजापुरात सोडतो असे सांगून काय मध्ये बसवुन कार चालकाकडून तिला लुबाडण्याचा प्रकार घडला. सायंकाळी 6 ते 6.30 या वेळेत कोदवली ते हातिवले या दरम्यान हा प्रकार घडला. यात या महिलेच्या डोक्यात त्या कार चालकाने लोखंडी रॉड मारून तिला गंभीर जखमी केले व तिच्याकडील सुमारे 33 हजाराचा ऐवज लांबविला आहे. तशी फिर्याद या महिलेने राजापूर पोलिसांना 2 ऑक्टोबर रोजी नोंदवलेली आहे.