Crime News | भोस्ते घाटातील 'त्या' सांगाड्यासह योगेश आर्याचे गूढ अद्यापही कायम

पोलिस पथके तीन ठिकाणी रवाना; तपास मात्र गुलदस्त्यात
 भोस्ते घाटातील 'त्या' सांगाड्यासह योगेश आर्याचे गूढ अद्यापही कायम
भोस्ते घाटातील 'त्या' सांगाड्यासह योगेश आर्याचे गूढ अद्यापही कायमFile Photo
Published on
Updated on

खेड : पुढारी वृत्तसेवा

भोस्ते घाटातील जंगलमय भागात सापडलेल्या मृतदेहाचे गुढ वाढतच चालले आहे. रत्नागिरी पोलिसांनी सावंतवाडीतील योगेश पिपळ आर्या या तरूणाची सखोल चौकशी केली. आजही तो पोलिसांना माहिती देत आहे. घाटातील सांगाडा व योगेश यांच्यातील स्वप्न या एकासंबंधा शिवाय पोलिसांना कोणताही उलगडा होताना दिसत नाही.

पोलिसांनी तीन ठिकाणी तपास पथके रवाना केली आहे मात्र, तपासातून उपलब्ध होणारी माहिती मात्र गुलदस्त्यात ठेऊन गोपनीयता पाळली जात आहे. सावंतवाडी येथील योगेश नामक तरुणाने खेडमध्ये येऊन एक मृतदेह मदतीची याचना करीत असून तो भोस्ते घाटातील जंगलात असल्याचे दि. १७ रोजी खेड पोलिसांना सांगितले.

योगेशला अनेक प्रश्न खेड पोलिसांनी विचारले. तरी तो सांगत होता की मला स्वप्न पडले आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, योगेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पोलिस भोस्ते घाटातील त्या जंगलात गेले तेव्हा अनोळखी व्यक्तीचा सांगाडा आणि बाजूला डोक्याची कवटी पडलेली पोलिसांना दिसली तर वर झाडाला फास बनवलेली दोरी झाडाला टांगलेली आढळली.

खेड पोलिसांनी योगेश आर्याच्या स्वप्नाचा संदर्भ देत अज्ञाताच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यामुळे या विषयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. एका बाजुला मृत व्यक्तीची ओळख शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु झाला आहे तर दुसऱ्या बाजूला योगेश आर्याची चौकशी सुरु झाली आहे.

योगेश आर्या याने पोलिसांना त्याच्या स्वप्ना बाबत सांगण्यापूर्वी पाच दिवस सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ समोर आल्याने या घटनेचे गूढ वाढले. त्यातच तो खेड मध्ये आल्यानंतर वेरळ येथील एका दुकानदार व्यक्तीला त्याने आपण मोबाईल टॉवरवर काम करण्यासाठी आल्याचे सांगितलं, अशी माहिती देखील समोर आली.

त्यामुळे मृत व्यक्तीने स्वप्नात सांगितले आणि मी त्याच्या मदतीसाठी खेडपर्यंत पोहोचलो या योगेशच्या म्हणण्यात विसंगती दिसत आहे. दरम्यान, अज्ञाताच्या मृतदेहाचे नमुने मिरज येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

तपासणी अहवाल प्राप्त झाल्या नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू घातपात की आत्महत्या याचा उलगडा होणार आहे. पोलिसांनी दुसऱ्या बाजूला तालुक्यातून जानेवारी २०२४ पासून बेपत्ता झालेल्या १८ जणांच्या नातेवाईकांकडे तसेच गोवा आणि सिंधुदुर्गातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्यास सुरवात केली आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news