रत्‍नागिरी : महिलेचा विनयभंग करून धमकी देणाऱ्या युवकाला ३ वर्षाच्या कारावासाची शिक्षा

रत्‍नागिरी : महिलेचा विनयभंग करून धमकी प्रकरण; युवकाला ३ वर्षांची शिक्षा
Ratnagiri: Woman molested and threatened case; Youth sentenced to 3 years
रत्‍नागिरी : महिलेचा विनयभंग करून धमकी प्रकरण; युवकाला ३ वर्षांची शिक्षा File Photo
Published on
Updated on

देवरुख पुढारी वृत्तसेवा:

महिलेचा विनयभंग करून धक्काबुक्की करणाऱ्या आणि कोणाला सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील युवकाला देवरुख न्यायालयाने ३ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. धामणी सोनारवाडी येथील सतीश विठोबा चव्हाण (वय ३० वर्ष) असे आरोपीचे नाव आहे.

Ratnagiri: Woman molested and threatened case; Youth sentenced to 3 years
Stock Market Updates | सेन्सेक्स पहिल्यांदाच ८० हजारांवर, 'निफ्टी'चाही नवा उच्चांक

सदर युवकाने सन २०२१ मध्ये आंबेड येथील महिलेचा विनयभंग करीत धक्काबुक्की केली होती. तसेच ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात आरोपी धिरोधात गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार तसेच पोलीस हवालदार संतोष झापडेकर, पोलीस हवालदार एस एस कामेरकर यांनी महत्वाचा तपास केला.

Ratnagiri: Woman molested and threatened case; Youth sentenced to 3 years
मराठा आरक्षणात आता मागासवर्ग आयोग प्रतिवादी

या प्रकरणाची सुनावणी झाली असता आरोपी सतीश विठोबा चव्हाण याला न्यायालयाने मंगळवारी गुन्ह्या प्रकरणी तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news