Ratnagiri : चिपळुणात न. प.चे प्रभागनिहाय आरक्षण सोडत

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक; आरक्षणाने अनेक उमेदवारांना मिळणार राजकीय वाटचालीची संधी
Ratnagiri News
चिपळुणात न. प.चे प्रभागनिहाय आरक्षण सोडत
Published on
Updated on

चिपळूण शहर : स्थानिक स्वराज्य सार्वत्रिक निवडणूक नियोजन कार्यक्रम अंतर्गत बुधवारी (दि. 8) चिपळूण नगर परिषद प्रभागनिहाय सदस्यांचे आरक्षण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आले. त्यानुसार 14 प्रभागातून 28 सदस्यांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये इच्छुकांसह माजी नगरसेवकांमध्ये खुषीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदापासून नगरसेवकपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत चिपळुणातील अनेक इच्छुकांना राजकीय मैदानात उतरण्याची संधी मिळणार आहे. एकूणच नगराध्यक्षपदासहीत प्रभागनिहाय आरक्षणात अनेकांना राजकीय वाटचालीची संधी उपलब्ध झाली आहे.

चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रात बुधवारी सकाळी 11 वा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे तसेच न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील 14 प्रभागांचे अ आणि ब पद्धतीने 28 सदस्यांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.

जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्र. 1 (अ) सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण., अनु. जाती 36, अनु. जमाती 0, प्रभागाचे नाव- गोवळकोट गाव, रचना- गोवळकोट चर, गोवळकोट धक्का, मशिदी पूर्वीची पाखाडी, शिंदेवाडी, करंजेश्वरी मंदिर परिसर, भैरवकरवाडी धक्का, कालुस्ते ब्रिज, वाशिष्ठी नदी उजवी बाजू, गोवळकोट गाव रोड उजवी बाजू ते गोवळकोट चर, सीमा- उत्तर दिशा वाशिष्ठी नदी, पूर्व दिशा गोवळकोट चर (तिठा), दक्षिण दिशा गोवळकोट गाव रोड, पश्चिम ः वाशिष्ठी नदी.

प्रभाग क्र. 2 अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब-सर्वसाधारण. अनु. जाती 0, अनु. जमाती 10. प्रभागाचे नाव- गोवळकोट रोड. रचना - गोवळकोट रोड आझादनगर रोड ते चरापर्यंत, गोवळकोट रोड संपूर्ण दोन्ही बाजू, गोवळकोट रोड मच्छीमार्केट ते दलवाई हायस्कूल बाजारपुलापर्यंत, आफ्रिन पार्क गोवळकोट रोड, दोन्ही बाजूने गोवळकोट चर, गोवळकोट गाव रोडची उजवी बाजू. उत्तर दिशा वाशिष्ठी नदी, पूर्वेला पेठमाप, दक्षिण वाशिष्ठी नदी, पश्चिम गोवहकोट गाव. प्रभाग क्र. 3 अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब-सर्वसाधारण. लोकसंख्या 4322, अनु. जाती. 82, अनु. जमाती 0, प्रभागाचे नाव ः पेठमाप, रचना ः पेठमाप बुरटेआळी, तांबट आळी, कोयना रस्ता, बाजारपूल, पेठमाप बौद्धवाडी, पालोजी मोेहल्ला, बाजारपेठ ते पटेल सॉ मील, गणेशवाडी, शिवनेरी चौक, जाड्येआळी. सीमा ः उत्तर - वाशिष्ठी नदी, पूर्व - वाशिष्ठी नदी, दक्षिण ः वाशिष्ठी नदी.

प्रभाग क्र. 4अ- नामाप्र, ब- सर्वसाधारण महिला. लोकसंख्या- 4129, अनु. जाती 106, अनु. जमात 0. नाव ः उक्ताड, रचना ः उक्ताड कानसेवाडी, गुहागर नाका, धान्य गोदाम ते चौक भाटकर मोहल्ला, मापारी मोहल्ला, मच्छी मार्केट परिसर, सावंत हॉस्पिटल, जोगळेकर गादी कारखाना, नाथ पै चौक, भेंडीनाका, परांजपे हायस्कूल, संसारे तिठा मारूती मंदिर, जागुष्टे पाखाडी, गांधी पाखाडी, अशोक गांधी घर ते विठ्ठल मंदिर, उत्तरेस वाशिष्ठी नदी, पूर्वेस भेंडीनाका, दक्षिणेस गुहागर बायपास, पश्चिमेस उक्ताड जि.प. मराठी शाळा. प्रभाग क्र. 5 लोकसंख्या ः 4298, अनु. जाती 193, अनु. जमात 14, नाव ः वाणीआळी. स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्ता, पेठमाप ब्रिजपर्यंत डावी बाजू, कन्या शाळा वडनाका, देसाई मोहल्ला, बेबल मोहल्ला, दादर मोहल्ला, वाणीआळी, पवारआळी, राऊतआळी, बेंदरकरआळी, जंगम आळी. उत्तरेस जुना कोयना रस्ता, पूर्वेस मार्कंडी, दक्षिणेस कन्या शाळा रोड, पश्चिमेस शिव नदी. प्रभाग क्र. 6 अ-नामाप्र महिला, ब-सर्वसाधारण. लोकसंख्या 3802. अनु. जाती 20, अनु. जमाती 14. नाव-मुरादपूर शंकरवाडी. रचना ः मुरादपूर मिठागरी मोहल्ला, कुंभारवाडी, गांधारेश्वर चौक ते गणपती मंदिरपासून रामेश्वर नगर रामतीर्थ तलाव ते शंकरवाडी तिठा परिसर, शंकरवाडी तिठा डावी बाजूपासून वरची व खालची भोईवाडी. उत्तरेस वाशिष्ठी, पूर्वेस शंकरवाडी, दक्षिणेस रामतीर्थ तलाव, पश्चिमेस पेठमाप ब्रिज. प्रभाग क्र. 7 अ-नामाप्र, ब-सर्वसाधारण महिला. अनु. जाती 262, अनु. जमाती 5. नाव = मार्कंडी, रचना ः शंकरवाडी तिठा उजवी बाजू, गांधी घर परिसर, भारतीय समाज सेवा केंद्र (सेतु) ते मार्कंडी जांभळेवाडी, स्वामी मठ परिसर ते गजानन सॉ मिल, साने हॉस्पिटल ते कोकण गादी मेकर्स मिल. उत्तरेस वाशिष्ठी नदी, पूर्वेस स्वामी मठ रोड, दक्षिणेस कराड रोड, पश्चिमेस काविळतळी.

प्रभाग क्र. 8 अ- सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण. लोकसंख्या 3596, अनु. जाती 217, जमाती 04. नाव ः काविळतळी वांगडे मोहल्ला. रचना ः चंद्रकांत सावर्डेकर यांचे घर ते खांडेकर हॉल ते कराड रोड पूर्व विभाग सोसायटी, जिव्हाळा बाजार चिपळूणकर अपार्टमेंट डावी बाजू, बांदल हायस्कूल ते परांजपे अपार्टमेंट ते वांगडे मोहल्ला, गांधीनगर काही भाग, बाळकृष्ण नगर. उत्तरेस वाशिष्ठी, पूर्व वांगडे मोहल्ला, दक्षिण कराड रोड, पश्चिमेस बागडेवाडी. प्रभाग क्र. 9 अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण. लोकसंख्या ः 3616, अनु. जाती 241, अनु. जमाती 55. नाव - राधाकृष्ण नगर. रचना ः संपूर्ण राधाकृष्ण नगर परिसर, बहादूरशेख ते परशुराम नगर ते हायवे प्रज्योती अपार्टमेंट. उत्तरेस कराड रोड, पूर्वेस न.प. हद्द, दक्षिणेस मुंबई-गोवा हायसवे, पश्चिमेस चिरंजीवी हॉस्पिटल. प्रभाग क्र. 10 अ-नामाप्र महिला, ब-सर्वसाधारण. लोकसंख्या 3780, अनु. जाती 253, अनु. जमाती 15, नाव ः रॉयलनगर. रचना ः प्रथमेश अपार्टमेंट, सिद्धकला अपार्टमेंट, अल्फा टॉवर ते महावीर मार्केट शिव नदी, उत्तरेस कराड रोड, पूर्वेस शिव नदी, दक्षिणेस महामार्ग, पश्चिमेस खेडेकर क्रीडा संकूल.

प्रभाग क्र. 11 अ- अनु. जाती महिला, ब- सर्वसाधारण. लोकसंख्या 3918. अनु. जाती 318, अनु. जमाती 5, नाव ः खेंड बाजारपेठ. रचना ः नगर परिषद इमारत, रंगोबा साबळे रोड, सोन्या मारूती खाटीक गल्ली, पानगल्ली, दुर्गाळी, संसारे तिठा, खेंड बावशेवाडी, कांगणेवाडी, स्वरविहार संकूल ते नगर परिषद इमारत. उत्तरेस वाशिष्ठी, पूर्वेस कांगणेवाडी, दक्षिणेस बावशेवाडी नगरपालिका परिसर, पश्चिमेस शिव नदी. प्रभाग क्र. 12 अ-सर्वसाधारण महिला, ब-सर्वसाधारण. लोकसंख्या 3518, अनु. जाती 110, अनु. जमाती 71, नाव ः पागमळा विरेश्वर कॉलनी. रचना ः शिव नदी ब्रिज डांगे दुकान ते गुहागर बायपास रोडपर्यंत, महालक्ष्मी नगर, लवेकर बाग, वरची बावशेवाडी, पागमळा, परांजपे स्कीम, पोलिस वसाहत, सिद्धकला अपार्टमेंट, बुरुमतळी, विरेश्वर कॉलनी. उत्तरेस भोगाळे, पूर्वेस विरेश्वर कॉलनी, दक्षिणेस महामार्ग, पश्चिमेस गुहागर बायपास. प्रभाग क्र. 13 अ-नामाप्र, ब-सर्वसाधारण महिाल. लोकसंख्या 3960, अनु. जाती 136, अनु. जमाती 13. नाव ः रावतळे ओझरवाडी. रचना ः रावतळे दोन्ही बाजू परिसर, हॉटेल ओअ‍ॅसिस ते प्रज्योत अपार्टमेंट ते कॉलेज, मतेवाडी, ओझरवाडी, शिवाजीनगर, प्रांत कार्यालय, किरण विहार संकूल, बौद्धवाडी काही भाग. उत्तरेस महामार्ग, पूर्वेस पाग बौद्धवाडी, दक्षिणेस रावतळे डोंगर, पश्चिमेस बहादूरशेख. प्रभाग क्र. 14 अ-सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण. अनु. जाती 138, अनु. जमाती 15. नाव ः पाग. रचना ः पाग बौद्धवाडी काही भाग ते पागझरी, जिद्द सोसायटी, यादव चाळ ते पॉवर हाऊस मुंबई-गोवा हायवे विश्रामगृहापर्यंत, डावी बाजू, पूर्ण कास्कर आळी, उघडा मारूती मंदिर परिसर, गोरिवले आळी, रानडे आळी, भगवा चौक परिसर, जोशी आळी कृष्णेश्वर मंदिर परिसर, सुकाई मंदिर परिसर, भागवत घर ते सुतारआळी, नगर परिषद गार्डन ते पागनाका परिसर. उत्तरेस महामार्ग, पूर्वेस पाग न.प. परिसर, दक्षिणेस पाग भाग, पश्चिमेस बौद्धवाडी परिसर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news