

दापोली : दापोली तालुक्यतील टेटवली गावातील देऊ रामजी भडवळकर यांच्या घराला आग लागल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. ही आग नेमकी कशी लागली, याचे कारण समजू शकते नाही.
या घटनेची माहिती मिळताच दापोलीचे माजी आमदार आणि रत्नागिरी उबाठा जिल्हाप्रमुख संजय कदम हे दुर्घटनाग्रस्त कार्यकर्त्यांच्या घरी पोहोचले आणि घटनेची माहिती घेतली. यावेळी प्रशासनाला सांगून तत्काळ भडवळकर यांना मदत मिळावी, यासाठी पंचनामा करण्यात आला.
यावेळी फुरूस विभाग प्रमुख दत्ता भिलारे, टेटवली ग्रामपंचायत सरपंच मेहबूब तेटवळकर, पोलिसपाटील, अतिश भागवत, तलाठी, साहिल शिंदे आदी उपस्थित होते.