

रत्नागिरी : दिवाळी सण अवघ्या काहीच दिवसांवर येवून ठेपला असून रत्नागिरीकर मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत खरेदी करीत आहेत.सणासुदीत ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई मिळावी म्हणून अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. मिठाई तपासणीसाठी पथक असणार असून हे पथक शहर व जिल्ह्यातील मिठाई दुकानात जावून अन्नाचे नमुने घेणार आहेत. मिठाईमध्ये भेसळ आढळल्यास दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांकडू मिठाई व इतर पदार्थ दूध, खवा, मावा, रवा, मैदा, आटा, खाद्य तेल, वनस्पती इ. मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. अन्न सुरक्षेविषयी कोणतीही घटना घडू नये म्हणून तसेच अन्न सुरक्षेची तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईची विशेष मोहिम सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षितेतचा हाती घेतला आहे.दरम्यान, सणासुदीत भेसळ होणार नाही यासाठी दोन बैठका घेवून व्यावसायिकांना सूचना देण्यात दिल्या आहेत. दिवाळी सण काहीच दिवसांवर असून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मिठाई, खवा, तेलासह विविध खाद्यपदार्थांवर करडी नजर असणार आहे. ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई मिळावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
सणासुदीच्या काळात अन्न व औषध विभागाने एकूण 20 विशेष तपासण्या करून 16 अन्न नमुने मिठाई, खवा, खाद्य तेल, पनीर, पोहा, चिवडा घेण्यात आले आहेत. तसेच अन्न सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5 दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आली आहे. यात 38 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. सणासुदीत 196 अन्न परवाने तर 771 नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
दिवाळीसाठी विविध प्रकारचे फराळ करीत असतात. त्यासाठी काही दुकानदार तेल सामान्य वापरतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जर फराळासाठी निकृष्ट दर्जाचे तेल वापरल्यास त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
दिवाळीसणात मिठाईला मोठे महत्व असते. त्यामुळे ग्राहक विविध प्रकारची मिठाई खरेदीसाठी दुकानात गर्दी करतात. सणासुदीत मिठाईत भेसळ होण्याची शक्यता आहे. शिळी, निकृष्ट दर्जाची मिठाई मिळण्याची शक्यता असते. जरी बेस्ट बिफोरची नियमावली शिथील केली असली तरी दुकानदारांनी ग्राहकांना चांगली, ताजी मिठाई द्यावी, अशी मागणी वाढत आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा दुकानांची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी सामान्य रत्नागिरीकर करीत आहेत.