रत्नागिरी : कारची ट्रकला धडक, एक गंभीर जखमी | पुढारी

रत्नागिरी : कारची ट्रकला धडक, एक गंभीर जखमी

खेड : पुढारी वृत्तसेवा

मुंबई- गोवा महामार्गावरील हॅपी पंजाबी ढाब्यासमोर ह्युंदाई क्रेटा कारने सोमवारी (दि. २०) पहाटे ४ वाजता महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. यामुळे कारमधील एक जण गंभीर जखमी झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी ह्युंदाई क्रेटा कारने (एम एच ४७ बी बी १५७७) महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला (जी जे २५ टी ९४०७) पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. हा अपघात सोमवारी पहाटे ४ वाजता सुमारास घडला.

या कारमधून प्रवास करणारे कदम हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कलंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्याचे पहावयास मिळाले. रामचंद्र लक्ष्मण कदम (वय ६२, रा. बोरिवली) असे जखमीचे नाव आहे. ते मालवण वरून मुंबईच्या दिशेने जात होते. महाड येथे ते थांबणार होते. रात्री पडलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका व मदत ग्रुपचे प्रसाद गांधी हे आपल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले.

हे ही वाचा :

Back to top button