रत्नागिरी : बलात्कार प्रकरणातील फरार संशयित १० वर्षानंतर अटकेत | पुढारी

रत्नागिरी : बलात्कार प्रकरणातील फरार संशयित १० वर्षानंतर अटकेत

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या संशयिताला 10 वर्षानंतर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अनुजकुमार स्वामीनाथ चौहान (रा.उत्तराप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

अनुजकुमार याने रत्नागिरीत २०११ मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून अनुजकुमार याच्याविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच अनुजकुमार याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर अनुजकुमार हा फरार झाला होता. अनुजकुमार याला अटक करण्यासाठी न्यायालयाकडून वारंवार अटक वॉरंट बजावण्यात येत होते. अनुजकुमारला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हते. यानंतर न्यायालयाकडून ३० ऑक्टोबर २०२१ रोजी अजामीनपात्र वॉरट बजावण्यात आले होते.

यानंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अनुजकुमारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. उत्तरप्रदेश येथील आपल्या गावी अनुजकुमारचा शोध घेण्यात आला. अनुजकुमार हा त्याच्या मुळ गावी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व त्यांनी राहत्या घरातून अटक कली. पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदकुमार साळवी व पोलीस नाईक महेंद्र खापरे यांनी ही कामगिरी बजावली. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Back to top button