नालिंबी, वसत खेलीवली परिसरात बिबट्याचा वावर, वन विभागाकडून पुष्‍टी | पुढारी

नालिंबी, वसत खेलीवली परिसरात बिबट्याचा वावर, वन विभागाकडून पुष्‍टी

डोंबिवली - भाग्यश्री प्रधान आचार्य

कल्याण तालुक्यातील नालिंबी, वसत खेलीवली येथील परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची चर्चा गावातील नागरिकांमध्ये रंगत होती. आता  याची पुष्‍टी वन विभागानेही केली आहे. या परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्‍याने उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

कांबा येथील ग्रामस्‍थांना पठार पाडा येथे तीन बिबटे दिसले होते.  ते नानेपाडा गावाच्या दिशेने गेल्‍याची माहिती ग्रामस्‍थांनी वन विभागाच्‍या कर्मचार्‍यांना दिली हाेती. मात्र वनविभागातील अधिकाऱ्यांना बिबट्याच्‍या वावरा संदर्भात कोणतेही पुरावे मिळाले नव्हते. कडून नांलिबी, पठार पाडा, वसत, वाघेरापाडा येथे ग्रामस्थांच्या बैठका घेऊन लोकांनी सावध रहावे, काळजी घ्यावी, जंगलात जाऊ नये, या खबरदाऱ्या घ्याव्या लागतील अशा संदर्भात माहिती दिली जात होती.

तबेल्‍यासमाेर लावले तीन कॅमेरे

यानंतर ग्रामस्‍थ  गुरुनाथ माळी यांच्या तबेल्यासमोर बांधण्‍यात आलेल्‍या वासरावर बिबट्याने हल्ला केला.  पठारपाडा येथे कुत्रा खाल्याचेही निदर्शनास आले. कल्याण तालुका वनविभाग अधिकारी संजय चन्ने यांनी बिबट्याने  वासरूओढून नेलेल्‍या तबेलासमोर
३ कॅमेरे लावले.

दुसऱ्या दिवशी त्या कॅमेरांमध्ये बिबट्याचे सुमारे २० ते ३० फोटो आढळूून आले. यावरून कल्याण तालुका परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे सिध्द झाले . त्यामुळे इतक्या दिवसांच्या उलटसुलट चर्चांना आता पुर्णविराम मिळाला. लोकांनी जंगलात एकट्याने जाऊ नये, फटाके वाजवावेत, स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन कल्याण वन विभागाने केले आहे.

परिसरात बिबट्याचा वावर असल्‍याचे ग्रामस्‍थांनी सांगितले. आम्ही देखील सतर्क झालो होतो. ज्या गावात बिबट्या दिसल्याच्या तक्रारी आल्या त्या-त्या गावात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये नागरिकांना सावध करण्यासाठी विविध सभा घेण्यात आल्या. गेल्या दोन दिवसापासून वन विभागाला गावातील बिबट्याच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत.
– संजय चन्ने, कल्याण वनविभाग अधिकारी

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : महाराष्ट्राला हसवणाऱ्या अभिनेत्री निर्मीती सावंत यासाठी रडतात

Back to top button