देवरूख : पुढारी वृत्तसेवा देवरूखची ग्रामदेवता सोळजाई माता मंदीराजवळ राहणारे व्यापारी मंगेश शेट्ये यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. भरवस्तीच्या परिसरात बिबट्याचा वावर उघड झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मंगेश शेट्ये यांचा विहिरीतील पाण्याचा पंप बंद पडल्याने ते पंपहाऊस जवळ पोहचले. यावेळी त्यांनी विहिरीतील पाईप पहायला विहीरीत डोकावले असता त्यांना विहीरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. त्यांनी शेजारच्या लोकांना याची माहिती दिली. यानंतर त्यांनी स्वयंसेवी संस्था व वन विभागाला याची माहिती दिली. देवरू़ख पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जनतेने गर्दी न करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा :