रत्नागिरी : डंम्पर पळवणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या | पुढारी

रत्नागिरी : डंम्पर पळवणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : निवळी येथील इसार पेट्रोलपंप येथून १० चाकी डंम्पर लांबावणाऱ्या तरुणाच्या मुसक्या शहर पोलिसांनी कर्नाटक येथून आवळल्या. लक्ष्मण उर्फ बाळु नामदेव चवरे ( २२ रा. चवरे वस्ती पेनुर, ता.मोहोळ, जिल्हा सोलापूर ) असे संशयिताचे नाव आहे. १४ मे रोजी रात्री ८.३० ते १५ मे २०२३ रोजी सकाळी ७.वा चे दरम्यान (एम.एच.08 अेपी 2764 ) हा 10 चाकी डंपर चोरीला गेला होता.

याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत समांतर तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाद्वारे समांतर तपास चालू होता. या गुन्हयाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ मे रोजी रोजी गाणगापूर ता. अफजलपूर, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक येथून अटक करण्यात आली.

आरोपीत याचे ताब्यातून गुन्हयातील चोरीस गेलेला डंम्पर, गुन्हा करताना वापरण्यात आलेली कार व इतर साहीत्य असा एकूण २८ लाख ६३ हजार २०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा करण्यासाठी
गणेश अरुण पाटील, समाधान शिवाजी चवरे दोन्ही (रा. पेनुर ता. मोहळ, जि. सोलापूर) हे सोबत असल्याची माहीती दिलेली आहे. हे दोन्ही स­हाईत गुन्हेगार आहेत. आरोपी व गुन्हयाकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी तपास पथकामधील सपोफौ संजय कांबळे,पोहेकॉ शांताराम झोरे,विजय आंबेकर,योगेश नार्वेकर,अतुल कांबळे. पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button