पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. ६) प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पस्थळी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. बारसू प्रकल्प दडपशाही करून स्थानिकांवर लादला जात आहे. त्यामुळे यामध्ये काहीतरी काळंबेरं असण्याची शक्यता आहे. बारसू प्रकल्पाबद्दल दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यावरणाची हानी होणार असेल, तर हा प्रकल्प नको, अशी भूमिका यावेळी ठाकरे यांनी घेतली.
उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरावर वरवंटा फिरवला जात आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी प्रकल्प समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. यावर बोलताना राणेंनी आत्मा विकाला असेल, अशी टीका ठाकरे यांनी केली. बारसू प्रकल्प दडपशाही करून लादल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला. हा प्रकल्प लादण्याआधी वेंदाता प्रकल्प राज्याबाहेर गेला, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याआधी ३ जिल्ह्यात कोण ओळख नव्हते. आता ३३ देशात त्यांची गद्दार अशी ओळख झाली आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.
हेही वाचा