आचऱ्याच्या सुकन्येचा आयपीएलमध्ये डंका; महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईकडून अष्टपैलू खेळाचे दर्शन | पुढारी

आचऱ्याच्या सुकन्येचा आयपीएलमध्ये डंका; महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईकडून अष्टपैलू खेळाचे दर्शन

आचरा; उदय बापर्डेकर : आचऱ्याची सुकन्या हुमेरा काझी हिने महिला प्रिमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना आपल्या दर्जेदार खेळातून मुंबई इंडियनला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य करुन आचरे गावचे नाव रोशन केले आहे.

हुमेराला गावची ओढ पहिल्या पासूनच होती. तिसरीमध्ये असल्यापासूनच तिला क्रिकेट खेळाची आवड निर्माण झाली होती. गावी आल्यावर मोठ्या टिमबरोबर खेळूनही जिंकत होती. ऑल राउंडर म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली होती. याबाबत तिच्याशी फोनवरुन संपर्क साधल्यावर तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी माहिती दिली. मुंबई संघातून १६ वर्षाखालील संघातून आपल्या करिअरची सुरुवात झाल्याचे सांगत १९ वर्षाखालील संघात सुरुवातीला आपली सोळावा खेळाडू म्हणून निवड झाली होती. खचून न जाताही संघात संधी मिळताच आपल्या खेळातून संघात स्थान निर्माण केले. त्यानंतर २३ वर्षाखालील संघातून खेळत सिनियर संघात स्थान निर्माण केले. महिला भारतीय संघात, दोनवेळा चॅलेंजर मधून खेळल्याचे तिने सांगितलं.

तिच्या खेळाने प्रभावित होत मुंबई इंडियन्तच्या संघमालक नीता अंबानी यांनी तिला मुंबई इंडियन्स मध्ये संधी दिली. संधीचा फायदा उठवित फायनल मध्ये ऍस्मेसला रनाऊट केले होते. आचरेगावच्या सुकन्येची क्रिकेटमधील एन्ट्री आचरवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

Back to top button