रत्‍नागिरी : आमदार योगेश कदम यांचे विश्वासू समर्थक प्रशांत पुसाळकर उद्धव ठाकरे गटात | पुढारी

रत्‍नागिरी : आमदार योगेश कदम यांचे विश्वासू समर्थक प्रशांत पुसाळकर उद्धव ठाकरे गटात

दापोली; प्रवीण शिंदे दापोली नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष आणि आमदार योगेश कदम यांचे विश्वावू समर्थक प्रशांत पुसाळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर सभेच्या पूर्व संध्येला मशाल हातात घेत उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला. पुसाळकर यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने योगेश कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा झाली होती. ही सभा राज्यात लक्षवेधी ठरली, तर या सभेनंतर माजी आमदार संजय कदम यांची लोकप्रियता वाढू लागली. त्या सभेला प्रतिउत्तर देण्यासाठी दि १९ रोजी खेड येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेआधीच पुसाळकर यांनी योगेश कदम यांना धक्का दिला आहे. दापोलीत आमदार योगेश कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे पुसाळकर यांचे फोटो असलेले बॅनर दापोली शहरात झळकत होते. हे बॅनर उतरण्याआधीच पुसाळकर यांनी योगेश कदम यांना रामराम केला आहे.

माजी आमदार संजय कदम यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरूच तर काही दिवसात संजय कदम योगेश कदम यांना झटका देण्याचे तयारीत असून, दापोली तालुक्यातील काही प्रमुख पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत दिसत आहेत.

पुसाळकर यांनी माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शिंदे गटाकडून सतत पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या परिवारावर खालच्या थरावर टीका होत असल्याने त्याचा तीव्र शब्दात निषेध करत” प्रवेश करत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी माजी आमदार सुर्यकांत दळवी,दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई,तालुकाप्रमुख रूषीकेश गुजर,मा.बाधकाम सभापती विश्वास उर्फ काका कदम, नरेंद्र करमरकर,शहरप्रमुख संदीप चव्हाण,दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा सौ.ममताताई मोरे,नगरसेविका सौ.नौसीन गिलगिले,नगरसेवक रविंद्र शिरसागर,नगरसेवक .अझीम चिपळूणकर,युवासेना शहर अधिकारी श्री.प्रसाद दरीपकर,बिपिन मोरे,उमेश शिंदे,जिल्हा युवती समन्वयक सौ.भाग्यश्री चव्हाण,युवासेना सचिव कु.साई मोरे,समन्वयक कु.सायली गावडे, मंगेश गावडे, .सुनिल साळवी,.दत्ता भिलारे,.अक्षय पाटणे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांसह महीला आघाडी युवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button