रत्नागिरी : पेवे-उंबरशेत खलाटी येथे सापडले ९ गावठी बॉम्ब | पुढारी

रत्नागिरी : पेवे-उंबरशेत खलाटी येथे सापडले ९ गावठी बॉम्ब

मंडणगड; पुढारी वृत्तसेवा : पेवे उंबरशेत खलाटी येथे मंडणगड पोलिसांना ९ गावठी बॉम्ब सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कुठल्याही कारणांसाठी गावठी बॉम्ब सापडण्याची मंडणगड तालुक्यातील ही पहीलीच वेळ आहे.

पोलिस दिलेली अधिक माहिती अशी की, काल (दि. २९) पोलिस मित्राने पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली. पेवे उंबरशेत खलाटी या ठिकाणी गावठी बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचून केलेल्या धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तीन संशयीतांसह ९ गावठी बॉम्ब ताब्यात घेतले.

दरम्यान, पुढील तपासामध्ये बाधा येऊ नये यासाठी पोलीसांनी अधिक माहिती दिली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुप्तता पाळली आहे. अधिक तपास युध्द पातळीवर सुरु आहे. काल बुधवारी (दि. २९) पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलिस निरिक्षक शैलजा सावंत, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गफार सय्यद, पोलिस कॉ़न्स्टेबल वैभव गमरे, पोलिस कॉन्स्टेबल ऋषीकेश देसाई यांनी सहभाग घेतला.

Back to top button