रत्नागिरी : गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास | पुढारी

रत्नागिरी : गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास

रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : मानसिक गतिमंद पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला शुक्रवारी (दि.१०) खेड न्यायालयाने १० वर्ष सश्रम कारावास आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना सन २०१८ मध्ये दापोली तालुक्यात मौजे माथेगुजर घडली होती. नारायण बाळू शिगवण (वय ६१ वर्षे ) , असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

दापोली तालुक्यातील दाभोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी मानसिक गतिमंद पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी नारायण बाळू शिगवण याला अटक करण्यात आली होती. मौजे माथेगुजर सुतारवाडी येथे दि. ०४नोव्हेंबर २०१८ रोजी नारायण शिगवण याने मानसिक गतिमंद असलेल्या मुलीला खाऊचे अमिष दाखवून अत्याचार केला होता. यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी खेड न्यायालयात खटला सुरू होता.

सरकारी वकील मृणाल जाडकर यांनी केलेला युक्तीवाद मान्य करत न्यायाधीश डी.एल. निकम यांनी आरोपीला १० वर्ष सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये इतका दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष साधी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाची एकूण रक्कम १ लाख रुपये असून त्यामधील ८० हजार रुपये पिडीतेला देणेबाबत आणि उर्वरीत २० हजार रुपये सरकार जमा करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button