आभाळ भरले होते तू येताना; आता डोळे भरले तू जाताना

आचरा
आचरा
Published on
Updated on

आचरा, उदय बापर्डेकर : आचरा पंचक्रोशीत अनंत चतुर्दशीला सायंकाळी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात झाले. "गणपती बाप्पा मोरया … मंगलमूर्ती मोरया … पुढच्या वर्षी लवकर या….!आशा जयघोषात आचरा  पंचक्रोशीसह  सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठीक ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी  मनोभावे आरती करत आपल्या लाडक्या बाप्पाला  भक्तिभावाने निरोप देण्यात आला.

गेल्या दहा दिवसांपासून भक्ती भावाने पूजाअर्चा केली . दररोज आरती , भजन , तसेच गोड – गोड पदार्थ अस मेजवानीच हे 'मंतरलेले दिवस 'कधी संपूच नये असे प्रत्येक गणेश भक्ताला वाटत होते . पण बघता बघता १० व्या दिवशी अनंत चतुर्दशी आली आणि भक्तीमय वातावरणात आपल्या लाडक्या गणपती बाप्पला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे . आचरा -पिरावाडी समुद्र किनारी, पारवाडी नदी, तलाव,ओहळ, आदी ठिकाणी श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेश चतुर्थी सण भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. दीड,पाच,सात,नऊ,अकरा,सतरा, ऐकविस दिवस श्री च्या मूर्ती चे पूजन केले जाते. ढोल – ताशाचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी आशा वातावरणात निरोप देण्यात आला. आचरा येथे विसर्जन स्थळी  ठीक ठिकाणी आचरा पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news