
कणकवली : मोहन पडवळ; गणेश चतुर्थी हा सण कोकणातील सर्वात मोठा सण आहे. गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान आपल्या घरी दाखल होत आहेत. त्यामुळे वर्षभर बंद असलेली घरे आता उघडली आहेत. मुंबईसह अन्य शहरांतून चाकरमानी जिल्ह्यात लाखोच्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत.
गणेश चतुर्थी सण हा कोकणातील महत्त्वाचा सण मनाला जातो. या सणाला कोकणातील प्रत्येक घरातील व्यक्ती न चूकता गावी येत असते. 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला घरोघरी गणपतीची मूर्ती आणून विधीवत पूजा केली जाणार आहे. सध्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी आपल्या घरांची साफसफाई व रंगरंगोटी करण्यासाठी चार दिवस अगोदर गावी येत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरोघरी साफसफाई व रंगरंगोटीचे काम जोरदार सुरू आहे. आकर्षक विद्युत रोषणाई त्याचप्रमाणे सजावटीचे काम सुरू आहे. गावोगावी भक्तिमय व चैतण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नेहमी बंद असलेली घरे उघडी झाल्यामुळे आता वाड्या- वस्त्या गजबजलेल्या आहेत. घरा-घरांत गणेशाची भक्ती गीतांचे सूर ऐकू येत आहेत.