नारायण राणेंना लागला वीजेचा शॉक; ते पाहून प्रवीण दरेकरही हबकले! | पुढारी

नारायण राणेंना लागला वीजेचा शॉक; ते पाहून प्रवीण दरेकरही हबकले!

कणकवली; पुढारी ऑनलाईन : नारायण राणेंना लागला वीजेचा शॉक : केंद्रीय मंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांची जन आशीर्वाद यात्रा कोकणात पोहोचली आहे. ते आज आपल्या होम पीचवर म्हणजेच सिंधुदुर्गमध्ये आहेत.

नारायण राणेंना लागला वीजेचा शॉक

नारायण राणे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, कणकवलीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी एका व्यासपीठावर नारायण राणे जात असताना त्यांना शॉक लागला. त्यांचा तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागला.

यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या प्रवीण दरेकर यांनाही ते पाहून धक्का लागला. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरम्यान पाऊस पडून गेल्याने त्यांना तारेला स्पर्श होऊन राणेंना शॉक लागला.

तुम्ही घोषणा कमी करा आणि कामाला लागा, उद्योजक व्हा !

मला भरपूर प्रेम दिलात मी इतपर्यंत पोहचलो ते सिंधुदुर्गातील जनतेच्या आर्शिवादामुळे, वारंवार मी पाहतोय मुंबई पासून एक वाक्य कानावर येतेय राणे साहेब आगे बढो! हम तुम्हारे साथ है!आता मी दिल्लीला पोहचलो आता कुठे जायचे सांगा. मोदीच्या मंत्रिमंडळात गेलो हे शेवटचे पद आहे. तुम्ही घोषणा कमी करा आणि कामाला लागा, उद्योजक व्हा ! या जिल्ह्यातील बेकारी संपवा आर्थिक समुध्द व्हा असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनआर्शिवाद यात्रे निमित्ताने नागरिकांशी संवाद साधताना तळेरे येथे बोलत होते.

ना. राणे पुढे म्हणाले, माझ्या जिल्ह्यात मला आल्यासारखे वाटत असल्याने मी वारंवार तुमच्याशी बोलत आहे. भविष्यातही बोलणार. माझे केंद्रातील मंत्रीपद जे सूक्ष्म, लघु व मध्यम या विभागातर्फे बेकारासांठी ,उद्योगांना प्रेरणा देण्यासाठी, आर्थिक मदतीसाठी, संपूर्ण मार्गदर्शनासाठी माझ्या खात्यामार्फत माहिती दिली जाईल तसेच उद्योजक बनविले जाईल.

तुम्ही उद्योजक झाला, तर बेकारी कमी होईल. राज्याचे उत्पन्न वाढेल तुमचेही दरडोई उत्पन्न वाढेल आणि म्हणून माझा प्रयत्न असणार आहे. तुम्हा सर्वासाठी माझ्याकडे जे खाते आहे. त्या माध्यमातून कोकणातील जिल्हांना झुकते माप मिळावे आणि उद्योजक बनावे हे माझे प्रयत्न राहतील. जास्त काही बोलणार नाही तुमचे आभार व शुभेच्छा देण्यासाठी मी आलोय असे सांगितले .

तत्पूर्वी तळेरे येथे ना.राणे याच्या शुभहस्ते भारतीय जनता पार्टीचा फलकाचे अनावरण करण्यात आले.तसेच परीसरात ग्रामपंचायत, विविध संघटना,मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, भाजपा पदाधिकारी, युवामोर्चा, नागरीक यानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी सुहासिनींनी व जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आले. यावेळी तळेरेत मोठया संख्येने जनसागर उसळला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू जठार व राजू माळवदे यानी केले.

हे ही वाचलं का?

Back to top button