निलेश राणे : "जन आशीर्वाद यात्रा अडवली, तर आडवं करून पुढे जाऊ" | पुढारी

निलेश राणे : "जन आशीर्वाद यात्रा अडवली, तर आडवं करून पुढे जाऊ"

रत्नागिरी, पुढारी ऑनलाईन : “वैयक्तिक टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासासाठी काय हवे, हे जन आशीर्वाद यात्रेत सांगायला हवं होतं. जशी एक्शन तशीच रिएक्शन असते. पण, उद्धवसाहेब आमचं दैवत आहेत. त्यांच्यावर टीका होणार नाही, त्याची काळजी घेतली पाहिजे”, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. यावरून निलेश राणे यांनी प्रत्युतर दिलेलं आहे.

उदय सामंत म्हणाले की, “जन आशीर्वाद यात्रा कुणी काढावी, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे. केंद्राकडून त्यांना सांगितलं असेल. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली, तर त्याचे परिणाम काय होतात हे चार दिवसांपूर्वी पाहिलं असेल. टीका पुन्हा झाली तर प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे”, असंही उदय सानंत यांनी सांगितले.

“उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली तर त्याच पद्धतीनं उत्तर दिले जाईल. त्यावर आम्ही ठाम आहे. पण आता बघितलं तर रत्नागिरीपासून सिंधुदुर्गात येईपर्यंत ,आता नाव न घेता टीका सुरू झाली आहे. सिंधुदुर्गात येईपर्यंत टीकाच होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि झाली तर आम्ही त्याच पद्धतीने रिऍक्शन देऊ उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन टीका झाली तर संयम राहणार नाही”, असं इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

यावर भाजप नेते निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “वैभव नाईकसारख्या लोकांना आम्ही भीत नाही. आम्ही वैयक्तिक टीका कालही करत होतो, आज करणार आणि करत राहणार, काय करायचं ते करा. जन आशीर्वाद यात्रा अडवायचा प्रयत्न केला तर, आडवं करून पुढे जाऊ”, असा प्रति इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button