नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार : 'माझी अटक बेकायदेशीर, ठाकरे सरकारला सत्तेची मस्ती' | पुढारी

नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार : 'माझी अटक बेकायदेशीर, ठाकरे सरकारला सत्तेची मस्ती'

रत्नागिरी; पुढारी ऑनलाईन : नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. मला झालेली अटक बेकायदेशीर होती, ठाकरे सरकारला सत्तेची मस्ती आल्याचा घणाघात त्यांनी केला.

नारायण राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा इशारा दिला. राणेच्या पाठी लागू नका, अन्यथा मला सगळ बोलावं लागेल असा इशारा त्यांनी दिला. मी गुंड होतो, तर पहिल्यांदा मला पदे का दिली? अशी विचारणा त्यांनी केली.

नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला. लोकांच्या समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढल्याचे ते म्हणाले. राणे यांनी दिशा सालीयान आणि सुशांत सिंह यांच्या आत्महत्या प्रकरणावरून टीका केली. त्या हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेवर टीका करताना या सरकारने राज्याची पूर्णपणे वाट लावली असून, कोरोनामध्ये राज्याचा एक नंबर आहे. ही राज्याची ख्याती आहे. इथे सभा घेऊ नका, तिथे सभा घेऊ नका. हे फक्त राणेंसाठीच आहे. त्यांना सत्तेचा माज आला आहे. राणेंच्या जास्त पाठी लागू नका. नाहीतर मी तोंड उघडले ना तर तुम्हाला परवडणार नाही, हे लक्षात घ्या, असा इशाराही राणेंनी यावेळी दिला.

मी गुन्हेगार होतो तर मी मुख्यमंत्री, आमदार, मंत्री कसा झालो? तुम्हीच मला ही पदे दिलीत ना? असे सवालही उपस्थित केला. ज्यावेळी बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता त्यावेळी सुपुत्राला सोबत नेण्याऐवजी बाळासाहेबांनी मला सोबत नेले, असेही यावेळी त्यांनी सांगितले. राज्याचा सध्या गुन्हेगारीचा रेट वाढला आहे, असे त्यांनी सांगितले. कोकणासाठी अद्ययावत असे ओरोसला उद्योगांसाठी प्रशिक्षण केंद्र मंजूर केले असून, यासाठी 200 कोटी रूपये मंजूर झाले आहेत.

नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार : माझ्या पाठी लागू नका

राणे यांनी यावेळी शिवसेनेला इशारा दिला. माझ्या पाठिमागे लागू नका, अन्यथा मला सगळं बोलावं लागेल असे सांगत इशारा दिला. नंतर सगळं बोललो, तर परवडणार नाही असे ते म्हणाले. माझ्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार केल्याचे ते म्हणाले.

नारायण राणे म्हणाले..

दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली

सुशांत सिंहची हत्या झाली

राणेच्या पाठिमागे लागू नका

आता थोडं बोलतोय, नंतर सगळ बोललो परवडणार नाही

पहिली पदे का दिली?

राणेंच्या पाठी लागू नका नाही, तर सगळ बोलावं लागेल

माझा दौरा अडचणी जाणून घेण्यासाठी आहे.

कोकणाच्या औद्योगिक प्रगतीसाठी काम करणार आहे

माझ्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार झाला

हे ही वाचलं का?

VIDEO : नारायण राणे यांची पत्रकार परिषद

Back to top button