सिंधुदुर्ग : केसरकर समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी

deepak kesrkar
deepak kesrkar
Published on
Updated on

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटासोबत गेलेले बंडखोर आमदारांचे मुख्य प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना पदाधिकार्‍यांची हकालपट्टी करीत आणि सावंतवाडी शिवसेना शहर कार्यकारिणी बरखास्त करून त्या जागेवर मंगळवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी तडकाफडकी नव्याने नियुक्त्या केल्या आहेत. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या जागी चंद्रकांत कासार यांची तर खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर यांच्या जागी सावंतवाडी शहर प्रमुख पदावर शैलेश गवंडळकर यांची नियुक्ती केली. याशिवाय माजगाव विभाग प्रमुख पदावर असलेले संजय माजगावकर यांच्या हकालपट्टीनंतर त्यांच्या जागी सुनील गावडे यांची निवड करण्यात आली.

उपतालुका संघटकपदी भारती कासार तसेच सावंतवाडी उपतालुका प्रमुखपदी आबा सावंत तर उपशहर महिला संघटकपदी प्रगती बामणे, महिला शाखा प्रमुख अनुष्का कलंबिस्तकर, माजगाव विभाग प्रमुख पदी श्रेयस कासार, शहर शाखाप्रमुखपदी वनश्री वाडकर, सविता पेडणेकर, शहर शाखाप्रमुखपदी अनिषा चिले यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली. सुरुवातीला सावंतवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संजय पडते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला तालुकाप्रमुख रुपेश राऊत यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद, अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, काहीजण गेले तरी शिवसेना अभेद्यच राहील आणि त्यांच्या जोरावर आम्ही पुन्हा एकदा संघटना उभी करू, असा विश्वास तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.

वेंगुर्ले माजी तालुकाप्रमुख बाळा दळवी, जिल्हा महिला संघटक जान्हवी सावंत, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सावंतवाडी शहर महिला संघटक श्रुतिका दळवी, सावंतवाडी तालुका महिला संघटक अर्पणा कोठावळे, युवा सेना पदाधिकारी गुणाजी गावडे, योगेश नाईक, वेत्ये सरपंच स्नेहा मिठबावकर, पुरुषोत्तम राऊळ, सौ. सुजल रेमुळकर, सुभाष रेमुळकर, तालुका संघटक रश्मी माळवदे, विनोद काजरेकर, संतोष गावडे, उदय अळवणी, सुनिता राऊळ, राजा वाडकर, विनोद ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news