चिपळूण : नारायण राणेंच्या सत्कार कार्यक्रमात भाजप- शिवसेना कार्यकर्ते भिडले | पुढारी

चिपळूण : नारायण राणेंच्या सत्कार कार्यक्रमात भाजप- शिवसेना कार्यकर्ते भिडले

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण तालुका मराठा समाजातर्फे येथील आथिती हॉटेलसमोर महामार्गालगत नारायण राणे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण मध्ये मराठा समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना तलवार भेट दिली. याचवेळी शिवसैनिक चाल करत घटनास्थळी आले. यावेळी भाजप कार्यकर्ते त्यांना भिडले. सेना कार्यकर्त्यांनी राणे विरोधात घोषणा दिल्या. याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखले.

दरम्यान, चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे शिवसैनिक आक्रमक झाल्याचेही दिसून आले. येथे नारायण राणे यांचे पोस्टर फाडण्यात आले तर किरकोळ दगडफेकही झाली. येथे आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं.

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळून येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे सरकावर जोरदार हल्लाबोल केला. अटक करायला मी काही सामान्य माणूस नाही, मी केंद्रीय मंत्री आहे. मी जे बोललो ते गुन्हा नाहीच. आदेश कुठलाही काढू देत तो काही राष्ट्रपती आहे का? असा सवाल राणे यांनी केला आहे.

माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे माहित नाही. तक्रारदार सुधाकर बुडगजरला मी ओळखत नाही. उद्धव ठाकरे चिथावणीखोर बोलतात त्यावेळी गुन्हा होत नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राणेंच्या अटकेच्या शक्यतेने चिपळुणात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. वालोपे येथील रिमझ हॉटेलला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

अटक करताना प्रोटोकॉल पाळण्याची सूचना पोलीस पथकाला करण्यात आली आहे. आता राणे यांना अटक होते की काय याकडे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी बडगुजर यांनी नाशिक पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

 

Back to top button