हवामानशास्त्र विभाग: कोकणला रेड अलट | पुढारी

हवामानशास्त्र विभाग: कोकणला रेड अलट

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हवामानशास्त्र विभागाने कोकणसह मध्य महाराष्ट्राला 11 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणाला तीन दिवस, तर कोल्हापूर व पुणे जिल्ह्याला आगामी दोन दिवस रेड अ लर्ट देण्यात आला आहे. दक्षिण पाकिस्तानात अतितीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
तसेच भारतात अहमदाबाद, गुना, गोपाळपूर भागावरही तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

बंगालचा उपसागर व ओडिशा, महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी या भागातही कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यात पाऊस
आणखी वाढणार आहे. आता 11 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना दिला आहे. 10 जुलैनंतर पाऊस ओसरेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला होता. मात्र गुरुवारी पावसाचा जोर आणखी एक दिवसाने वाढणार असल्याचा नवा अंदाज देण्यात आला.

रेड अलर्ट : (कंसात जुलैमधील तारीख) कोल्हापूर (8), पालघर (9 व 10), ठाणे (8), मुंबई (8), रायगड (8 व 9), रत्नागिरी (8 व 9),
सिंधुदुर्ग (8), पुणे (8 व 9), सातारा (8 व 9). ऑरेंज अ लर्ट : पालघर (9 ते 11), ठाणे (9 ते 11), मुंबई (9 ते 11), रायगड (10 व 11),
रत्नागिरी (9 ते 11), सिंधुदुर्ग (9 ते 11), नाशिक ( 8), पुणे (10 व 11), कोल्हापूर (9 ते 11), सातारा (10 व 11), चंद्रपूर (8).

यलो अलर्ट : जळगाव (8), जालना (8), परभणी, हिंगोली, लातूर (8), नंदुरबार, धुळे (8), नागपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली (8 ते 11)

Back to top button