'कौन बनेगा करोडपती' मध्ये ४० लाख जिंकल्‍याची बतावणी करत पावणे नऊ लाखांची फसवणूक | पुढारी

'कौन बनेगा करोडपती' मध्ये ४० लाख जिंकल्‍याची बतावणी करत पावणे नऊ लाखांची फसवणूक

खेड ; पुढारी वृत्तसेवा :    खेड तालुक्यातील कोंडीवली येथील महिलेला ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात ४० लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगून पावणे नऊ लाखांची फसवणूक केल्‍याचा प्रकार समोर आला आहे.

खेड तालुक्यातील कोंडीवली येथील महिलेला तुम्ही ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात ४० लाख रुपये जिंकले आहेत. यासाठी तुम्‍हाला टॅक्सच्या मोबदल्यात ८ लाख ७६ हजार ५०० रू. भरावे लागतील, असा फोन आला.

या प्रकरणी आकाश वर्मा नामक व्यक्तीविराेधात येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या मुदतीत घडली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे करीत आहेत.

या प्रकरणी सईद जमालऊद्दीन कामाला रा कोंडीवली. ता खेड यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना कोंडीवली गावात घडली.

फिर्यादी यांना कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात ४० लाख रूपयाची लॉटरी लागली आहे.या मोबदल्यात ८ लाख ७६ हजार ७५० रू. टॅक्सची रक्‍कम भरावी लागेल, असा फाेन आला.

त्यांच्याकडून त्यांचा इस्लामी बँक दुबईच्या बँकेच्या चेकचा, आधाररकार्डचा व अन्य कागदपत्रांचे फोटो घेऊन तब्‍बल ८ लाख ७६ हजार ७५० रू. बॅक खात्‍यावरुन घेण्‍यात अआले.

रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला पोलिसांनी ऑनलाईन फसवणूकी पासून सावधान राहण्याचा अनेकदा इशारा देऊन देखील ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत.

Back to top button