रत्नागिरी : कपड्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी ३ लाखांचा ऐवज लांबविला | पुढारी

रत्नागिरी : कपड्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी ३ लाखांचा ऐवज लांबविला

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : बाजारपेठेतील कपड्यांचे दुकान फोडून चाेरट्यांनी  रोख रक्कम आणि कपडे असा एकूण सुमारे ३ लाख १९ हजार ७०० रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना रविवार (दि. १५ मे) रोजी घडली.  याप्रकरणी दुकान मालक कमलेश भवरलाल गुंदेचा ( वय ४१ , रा. पऱ्याची आळी, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, कमलेश भवरलाल गुंदेचा यांचे राम आळी येथे कॉर्नर स्टाईल नावाचे कपड्यांचे दुकान आहे. शनिवार मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने दुकानाच्या टेरेसवरील लोखंडी ग्रील हत्याराने उचकटून दुकानात प्रवेश केला.  दुकानातील रोख २५ हजार रुपये, चांदीची नाणी आणि नामांकित कंपन्याचे कपडे अशा एकूण सुमारे ३ लाख १९ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेत पोबारा केला. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button