रत्नागिरी : पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धेचे दागिने लांबविले | पुढारी

रत्नागिरी : पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धेचे दागिने लांबविले

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध महिलेकडून ७० हजार रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास उद्यमनगर एकता मार्ग येथे घडली. अशा प्रकारची ही दुसरी घटना घडली आहे. याबाबत जागृती जयराम तावडे ( वय ७०, रा.के. सी. जैननगर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ७ मे रोजी सायंकाळी जागृती तावडे मिक्सर दुरुस्ती करण्यासाठी मारुती मंदिर येथे गेल्या होत्या. तिथून परतत असताना एकता मार्ग येथे एका अज्ञाताने त्यांच्याजवळ येऊन दुसऱ्या एका व्यक्तीकडे बोट दाखवून ते पोलीस असून तुम्हाला बोलावत असल्याचे सांगितले. तेवढ्यात अजून एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि त्याने जागृती तावडे यांच्या पाटल्या आणि चेन काढून घेऊन खोट्या दागिन्यांची पुडी त्यांच्या हातात दिली. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button