सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ३०६ सक्रिय कोरोनाबाधित | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ३०६ सक्रिय कोरोनाबाधित

सिंधुदुर्ग ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बुधवारी 105 रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह मिळालेल्या एकूण रुग्णांची संख्या 48 हजार 817 झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या 2 हजार 306 रुग्ण सक्रिय आहेत. बुधवारी 195 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची संख्या 45 हजार 250 झाली आहे. दरम्यान, कणकवली तालुक्यातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांमध्ये देवगड 337, दोडामार्ग 61, कणकवली 430, कुडाळ 618, मालवण 298, सावंतवाडी 267, वैभववाडी 135, वेंगुर्ला 143, जिल्ह्याबाहेरील 17 रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1 हजार 259 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये देवगड 161, दोडामार्ग 35, कणकवली 263, कुडाळ 192, मालवण 258, सावंतवाडी 172, वैभववाडी 72, वेंगुर्ला 97, जिल्ह्याबाहेरील 9 रुग्णांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्टचे 2 लाख 20 हजार 982 नमुने तपासण्यात आले. पैकी 34 हजार 674 नमुने पॉझिटिव्ह आले. बुधवारी 1 हजार 884 नमुने तपासण्यात आले.

तर अ‍ॅन्टिजन टेस्टचे 2 लाख 47 हजार 394 नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 14 हजार 668 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 97 अ‍ॅन्टिजन टेस्ट नमुने तपासण्यात आले. जिल्ह्यात अद्यापही ऑक्सिजनवर 121 रुग्ण व व्हेंटिलेटरवर 31 रुग्ण उपचार घेत आहेत.

Back to top button