पावस : गणेशगुळे समुद्रकिनारी डॉल्फिन आढळला मृतावस्थेत
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनारी डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडून आला. पोलिसपाटील संतोष लाड तसेच चिन्मय रांगणकर यांच्या नजरेस हा मासा पडल्यानंतर त्याला जीवदान देण्याच्या उद्देशाने येथील तरुणांनी काही प्रमाणात प्रयत्न केला. परंतु डॉल्फिन मासा सुमारे आठ ते दहा फूट लांबीचा व दीडशे ते दोनशे किलो वजनाचा असल्याने त्याला बाजूला करणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याला जखमी अवस्थेत जीवदान देणे कठीण बनले. मासा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अखेर रात्री आलेल्या समुद्राच्या भरतीमध्ये हा मासा पाण्यात गेला.
हेही वाचा
- गंगाखेड-परळी राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोडीने सिने अभिनेते सयाजी शिंदे भावूक!
- त्र्यंबकेश्वर : आमच्या पाण्याची गोष्ट, स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही वणवण
- सोलापूर : पाचव्या आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन घोषणापत्राचे नितीन गडकरींच्या हस्ते लाँचिंग
- Kieron Pollard : कायरन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती