Mahashivaratri : नेरूर येथील महाशिवरात्री उत्सवाला भाविकांची गर्दी | पुढारी

Mahashivaratri : नेरूर येथील महाशिवरात्री उत्सवाला भाविकांची गर्दी

वालावल, पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील श्री क्षेत्र नेरूर (Nerur) येथील श्री देव कलेश्वर मंदिरात मंगळवारी महाशिवरात्री (Mahashivaratri) उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या निमित्त श्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक भक्तांनी गर्दी केली आहे. गेले पाच दिवस भक्तीमय वातावरणात विविध कार्यक्रम पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जात आहे. ओम नमः शिवाय…च्या जयघोषाने मंदिर परिसर दूमदूमन गेला आहे. या उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

महाशिवरात्री  (Mahashivaratr) उत्सवानिमित्त श्री देव कलेश्वर मंदिरात गेले पाच दिवस विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम साध्या पद्धतीने उत्साहात पार पडले. कोरोना महामारी पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या वर्षीचा हा महाशिवरात्री व रथोत्सव साधेपणाने साजरा केला जात आहे. महाशिवरात्री दिवशी मंगळवारी सकाळी अभिषेक, धार्मिक विधी व अन्य कार्यक्रम पार पडले.

Koo App

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

800 वर्षांपूर्वीचं गोंदेश्वराचं प्राचीन मंदिर

Back to top button