Olive Ridley Turtle : सॅटेलाईट टॅगिंगद्वारे उलगडणार ऑलिव्ह रिडले मादीचा जगभरातील प्रवास - पुढारी

Olive Ridley Turtle : सॅटेलाईट टॅगिंगद्वारे उलगडणार ऑलिव्ह रिडले मादीचा जगभरातील प्रवास

दापोली : प्रवीण शिंदे

कासव हा जैवसाखळीतील महत्त्वाचा घटक असल्याने आता या कासवाचे वनविभागाकडून सॅटेलाईट टॅगिंग होणार आहे. याद्वारे ऑलिव्ह रिडले मादीचा जगभरातील प्रवास उलगडणार आहे. ऑलिव्ह रिडले मादीच्या सॅटेलाईट टॅगिंगसाठी रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणचे पाच किनारे निवडण्यात आले आहेत. (Olive Ridley Turtle)

रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले दापोली,मंडणगड मधील वेळास आणि रायगड जिल्ह्यातील  ३ अशी एकूण पाच ठिकाणे निवडण्यात आली आहेत. कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त असते. त्या मुळे समुद्री कासव मादी ही अंडी देण्यासाठी किती दूर जाऊ शकते या बाबत या सॅटेलाईट टॅगिंग मधून माहिती उपलब्ध होणार आहे.समुद्री कासव मादी ही जगभरातील कोणत्याही देशातील समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यास जाऊ शकते अशी माहिती पुढे येत आहे. (Olive Ridley Turtle)

आत प्रत्यक्ष या सॅटेलाईट टॅगिंगचे माध्यमातून ही माहिती उपलब्ध होणार आहे. दिनांक २५ ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये, ओलिव्ह रिडले समुद्री कासव मादीचे सॅटेलाईट टॅगिंग डब्लू एल एल ची टॅगिंग टीम यांचे मार्गदर्शनाखाली  होणार आहे. यासाठी कांदळवन कक्ष टीम मौजे वेळास मंडणगड व मौजे आंजर्ले दापोली येथे दाखल झाली असून या साठी डॉ.सुरेश कुमार  दिनांक २४ रोजी दाखल झाले आहेत. निवडलेल्या या पाच ठिकाणी जी मादी अंडी देण्यासाठी येईल अशा मादीला अंडी दिल्या नंतर परत जाताना पकडून त्या मादीच्या पाठीवर सॅटेलाईट टॅगिंग चीफ बसविले जाईल. त्यानंतर पुढील आठ दिवस ती मादी वनविभाग आणि या मिशन मध्ये असणारी टीम यांचे निगराणीखाली राहील त्या नंतर या मादीला समुद्रात सोडण्यात येईल. या साठी वैद्यकीय  टीम देखील असणार आहे. (Olive Ridley Turtle)

Back to top button