नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा : अशोक चव्हाण | पुढारी

नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा : अशोक चव्हाण

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे. आजच्या राजकीय परिस्थितीमुळे पत्रकार सद्यस्थितीवर लिहिण्यास घाबरत आहेत. यामधून मार्ग निघाला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. घनसांवगी येथे आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेच्या 42 व्या साहित्य संमेलनात दशा आणि दिशा या विषयावर ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर स्वागत अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे आमदार अंबादास दानवे, आमदार राजेश टोपे, माजी आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार अर्जुन खोतकर, माजी मंत्री सुरेश नवले, प्राचार्य राजेंद्र परदेशी, ऐ. जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, प्रभाकर पवार राजेभाऊ देशमुख, लक्ष्मणराव वरले, आदी उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले की जनतेपुढे जाताना फार विचारपूर्वक बोलले पाहिजे महापुरुषांविषयी वाईट बोलण्याचा उच्चांक झाला आहे. यातून चांगल्या विषयाला बगल देण्याचे सध्या काम चालू आहे.

यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अंबादास दानवे अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री सुरेश नवले यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नांदेड विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख पृथ्वीराज तोर यांनी सूत्रसंचालन केले. जगन दुर्गे यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button