मंठा; पुढारी वृत्तसेवा : मंठा शहरात वीज वितरण कंपनीने 88 लाख रुपयांची थकित वीजबिलाची वसुली मोहीम जोरात सुरू केली
आहे. महावितरणच्या वसुली पथकाने दोन दिवसात2 लाख 65 हजार रुपये वसूल केले आहेत. थकबाकी असलेल्या 44 थकबाकीदार
ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असुन 16 आकडेबहाद्दरावर कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांनी विज चोरी करू नये तसेच अधिकृत वीज जोडणी करून घ्यावी असे आवाहन सहाय्यक अभियंता अनिल जंगम यांनी केले आहे.
मंठा शहर व परिसरातील मीटर धारकांकडे असलेल्या वीजबिलाच्या थकबाकीचा आकडा मोठा आहे. महावितरणने 44 थकबाकीदार
वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला असुन 16 आकडेबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत महावितरण थेट घरोघरी जाऊन वीजबिलाची वसुली करीत असल्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहक वीजबिलाचा भरणा करत आहेत.
थकबाकीदार वीज ग्राहकांनी वीज बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक अभियंता अनिल जंगम यांनी केले आहे .
वीज ग्राहकांना वारंवार सूचना देऊनही घरगुती व व्यवसायीक ग्राहक वीजबिलाचा भरणा करत नसल्याने महावितरणचे जालना
येथील कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती यांनी पथकाच्या मदतीने वसुली सुरू केली आहे. शहरात सुमारे 4 हजारांपेक्षा जास्त वीज ग्राहक असून 88 लाख रुपये थकबाकी आहे.
विज थकबाकीदारांनी विज बील भरावे यासाठी शहरातील विविध भागांत महावितरणचे पथक वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत आहे. ग्राहकांनी वीजचोरी करू नये, अधिकृत वीज जोडणी घ्यावी असे अवाहन केले जात आहे.वीजबिल वसुली
पथकामध्ये कर्मचारी दत्तात्रेय भोम्बे, विष्णू घनवट, सोपान वाघ, कुलदीप वाघमारे, विक्रम घनवट, नामदेव गवळी, सुनंदा सोळंके, बापू मिसाळ, विशाल मस्के, एस. देशमुख, संतोष पौळ, एकनाथ पाटील, देविदास काळे, रवीकुमार जैद, नवनाथ देशमुख, सचिन मोरे दिनेश गादेवाड, भारत अवचार यांच्यासह महावितरणचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.