जालना : ग्रामसेवक, सरपंचाने केली 41 लाखांची फसवणूक | पुढारी

जालना : ग्रामसेवक, सरपंचाने केली 41 लाखांची फसवणूक

जालना; पुढारी वृत्तसेवा :  जाफराबाद तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीचे तात्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करुन 40 लाख 91 हजार रुपयांची अनियमितता करुन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत जाफराबाद पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी नारायण खिल्लारे यांनी दिलेल्या फिर्यादी म्हंटले आहे कि, तात्कालीन ग्रामसेवक प्रदिप अर्जुनराव तांबीले व तात्कालीन सरपंच गंगाधर राधाकिसन खरात यांनी संगनमत करुन 2012 ते 2020 या कालावधीत डोणगाव येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची कामाअंतर्गत 30 लाख रुपयांची आर्थीक अनियमीतता तसेच 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत केलेल्या कामामधे 10 लाख 91 हजार 335 रुपये असा 40 लाख 91 हजार 335 रुपयांची अनियमीता करुन फसवणुक
केली .या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

Back to top button