जालना : कन्हैयानगर रस्त्यावरील खड्डयाने घेतला शेतकऱ्याचा बळी | पुढारी

जालना : कन्हैयानगर रस्त्यावरील खड्डयाने घेतला शेतकऱ्याचा बळी

जालना, पुढारी वृत्‍तसेवा : राष्ट्रीय महामार्ग ७५३ ए या रस्त्याचे चौपदरीकरण, सिमेंटीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु कन्हैय्यानगर परिसरातील तीन किलोमीटर रस्त्यांचे काम गेल्या तीन वर्षभरापासून रखडले आहे. यामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सोमवारी ( दि.१५) सकाळी साडेसहाच्या सुमारास नवीन मोंढ्यात भाजीपाला घेवून जात असलेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीला मालट्रकची जोरदार धडक बसली. अपघातात शेतकरी भगवान मुरलीधर बडदे ( वय ३७) ठार झाले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच ७५३ ऐ एमआयडीसी चौफुली जालना ते टाकरखेडा भाग दोन कन्हैयानगर पूल नवीन मोंढा रस्ता ते देऊळगाव राजा रस्त्यावरील वनविभागाच्या पुलापर्यंत (वन विभाग हद्द सर्वे न २१०) चे काम प्रलंबित आहे. कन्हैयानगर ते मोंढा या रस्त्यास वन विभागाने परवानगी न दिल्याने काम बंद झाले. यामुळे तीन वर्षांपासून काम रखडले आहे. येथून हजारो वाहनांची वर्दळ असते.

रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे वाहन चालकांना समजत नाही. कारण रस्त्यांची चाळणी झाली आहे. या रस्त्यावर दोन फुटापर्यंत खड्डे पडले आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यातच फुलेनगर जामवाडी येथील शेतकरी भगवान बडदे यांचा अपघाती मृत्यू झाला.

रस्त्यावर मालवाहतूक मोठी असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालक जामवाडी, श्रीकृष्णनगर, पानशेंद्रा, धावेडी, गोंदेगाव, वंजार उम्रद, वाघूरळ या भागातील शेतकरी बाजार समितीत भाजीपाला, तसेच शहरात दूध विक्रीसाठी आणतात. याच रस्त्यावर शेतकरी व दूध विक्रेते यांना मोठी कसरत करावी लागते. रस्ता दुरूस्त करण्यात यावा, यासाठी युवकांनी जिल्हाधिकारी ‍यांना निवेदन दिले आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधानसभेत याविषयी आवाज उठवूनही काहीच फरक पडला आहे. राज्यात नवीन सरकार आल्याने या सरकाराने या रस्त्याचे काम मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा 

Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांनी कंपनी व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली

 जळगाव : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव दिनी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न 

Liger : स्वातंत्र्यदिनी रिलीज झाले विजय देवराकोंडाच्या लायगरचे नवे पोस्टर

Back to top button