औंरगाबाद : मनसेने तोडले महापालिका आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन 

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक झाली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी आधी दिलेल्या इशाऱ्यानुसार रविवारी पहाटे औरंगाबाद मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडले.

औरंगाबाद शहरात काही भागात ५ दिवसांतून तर, काही भागात ८ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो आहे.

शहराला आठवडाभरात किमान दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मनसेने नुकतीच केली होती.

ही मागणी १० दिवसांत मान्य न झाल्यास मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्याचे नळ कनेक्शन तोडू, असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक बिपिन नाईक, वैभव मिटकर यांनी दिला होता.

त्यानुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या शासकीय बंगलाचे आज पहाटे नळ कनेक्शन तोडले.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरच्या तरुणाचे मधुमाशी पालन व्यवसाय यशस्वी

Back to top button