पैठण ते पाचोड पहिली लालपरी पोलीस बंदोबस्तामध्ये रवाना | पुढारी

पैठण ते पाचोड पहिली लालपरी पोलीस बंदोबस्तामध्ये रवाना

पैठण ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा नोव्हेंबर रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहक संघटनेने विविध मागण्यासाठी उपोषण करून बस सेवा बंद केली होती. शनिवारी (दि. २०) रात्री सात वाजता पैठण आगारातील बस पोलीस बंदोबस्तामध्ये पैठण ते पाचोड येथे रवाना करण्यात आली. यामुळे उपोषणास बसलेल्या चालक वाहक यांच्यामध्ये फूट पडल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या चालक वाहक यांनी विविध मागण्यासाठी संप करून बस सेवा बंद करून बस स्थानक परिसरात ठिय्या आंदोलन सुरू होते. संप सुरू असतानाच शनिवारी रात्री सात वाजता पैठण येथील आगार प्रमुख सुहास तरवडे यांनी पैठण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांच्या पथकाच्या बंदोबस्तात पैठण ते पाचोड ( क्र. एमएच २० बीआय २१९४) ही बस रवाना केली आहे.

त्यामुळे सुरु असलेला संप मिटला का काय अशी विचारणा अनेक प्रवासी बसस्थानकावर चौकशी करीत होते. संपामध्ये सहभागी होणाऱ्या चालक वाहक यांनी सेवेमध्ये रुजू होण्यासाठी आगारातील अधिकाऱ्याच्या वतीने शर्यतीच्या प्रयत्न सुरू करण्यात आला आहे.

Back to top button