पैठण : एसटी आगारामध्ये प्रलंबित मागण्यांसाठी बंद आंदोलन | पुढारी

पैठण : एसटी आगारामध्ये प्रलंबित मागण्यांसाठी बंद आंदोलन

पैठण पुढारी वृत्तसेवा :

पैठण येथील राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक, तांत्रिक कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज (गुरुवार) सकाळपासूनच पैठण आगारातील बस बंद करून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील सर्व संघटनेच्या कृती समितीने बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली. यामुळे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता, चालक वाहक यांना घरभाडे, दीपावली सणासाठी पंधरा हजार रुपये बोनस देण्याच्या मागणीसाठी पैठण येथील आगारामधील गुरुवार सकाळपासून चालक ११९ वाहक, ९९ तांत्रिक कामगार, ३२ प्रशासकीय कर्मचारी यांनी लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद करून बस स्थानकावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या दरम्यान दहा ठिकाणच्या मुक्कामी बस सेवा सुरू असल्याची माहिती आगारप्रमुख सुहास तरवडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे. सणासुदीच्या काळात बस सेवा अचानक बंद झाल्यामुळे प्रवासी नागरिक, महिला, शालेय महाविद्यालयाचे विद्यार्थी यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

Back to top button