औरंगाबाद : वाळूज येथे नशेत शिवीगाळ केल्याने शिर केले धडावेगळे; दोघांना अटक | पुढारी

औरंगाबाद : वाळूज येथे नशेत शिवीगाळ केल्याने शिर केले धडावेगळे; दोघांना अटक

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :  वाळूज एमआयडीसीतील बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात अजय व्यंकटराव निलवर्न देशमुख (२१, रा. रांजणगाव शे. पु.) तरुणाचे शिर धडावेगळे करून केलेल्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले. त्याच्या दोन मित्रांनीच दारुच्या नशेत अजयने शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरून त्याचा दगडाने गळा चिरुन खून केला. नंतर प्रेत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. खून करणाऱ्या निखिल भाऊसाहेब गरड ( १९ रा. जळगाव, ता. पैठण. ह. मु. शिवनेरी कॉलनी रांजणगाव शे. पु.) व प्रतीक सत्यवान शिंदे (२१ रा. हिवरे, ता. कोरगाव, जि. सातारा ह.मु. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या विषयी पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वाळूज एमआयडीसीत असलेली फतेजा फोर्जिंग या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात एका अन- ळखी तरुणाचा धारदार वस्तूने शिर धडावेगळे करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना १५ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. तपासात हे प्रेत अजय व्यंकटराव देशमुख याचे असल्याचे समोर आले. ओळख पटल्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्यावरून पोलिसांनी मृत अजय याच्या मित्रांकडे विचार- पूस केली. तेव्हा असता खुनाच्या घटनेनंतर अजय याचे दोन मित्र गायब झाल्याचे त्यांना समजले. यावरून पोलिसांनी १९ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण येथून निखील गरड व प्रतीक शिंदे या दोघांना ताब्यात घेतले. औरंगाबादेत आणल्यानंतर दोघांना ‘खाक्या’ दाखविताच त्यांनी अजयचा दगडाने गळा चिरून खून केल्याची स्पष्ट कबुली दिली.

दगडानेच तोडले शिर

मृत आणि दोन्ही आरोपी हे १४ जानेवारी रोजी एमआयडीसीत सोबत दारू पित बसले होते. नशेत अजयने या दोघांना शिवीगाळ केली. त्याने केलेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून निखील व प्रतीकने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अजयला दुचाकीवर बसवून फतेजा फोर्जिंग या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात आणले. याठिकाणी दोघांनी नशेत असलेल्या अजय याची मान दगडावर ठेवून धारदार दगडाने त्याचे मुंडके धडावेगळे केले. त्यानंतर दोघांनी मृत अजय याच्या खिशातील ६ हजार रुपये काढून घेत त्याच्या अंगातील शर्ट काढला. तसेच दुचाकीमधून पेट्रोल काढून त्यांनी वाळलेले काटेरी झुडपे मृत अजय याच्या मृतदेहावर टाकून आग लागून ते अजय याची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांना सांगितले.

Back to top button