औरंगाबाद : जुन्या वादातून सोलनापुर येथे दोन गटात हाणामारी | पुढारी

औरंगाबाद : जुन्या वादातून सोलनापुर येथे दोन गटात हाणामारी

पैठण : पुढारी वृत्तसेवा; पैठण तालुक्यातील सोलनापुर येथे दोन गटात जुन्या भांडणाच्या कारणावरून लाट्या काठयाने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी (दि,४) रात्री घडली आहे. या हाणामारीत नऊ जण जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील सोलनापूर येथील रविवारी रात्री खरात बंधूच्या दोन गटात जुन्या भांड्याच्या कारणावरून लाट्या-काट्यांनी जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत संतोष खरात, मच्छिंद्र खरात, जालिंदर खरात, नानासाहेब श्रीराम खरात, नंदू तुळशीराम खरात, संभाजी सोमनाथ खरात, श्रीराम काशिनाथ खरात हे जखमी झाले आहेत. जखमींना गावकऱ्यांच्या मदतीने पैठण येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या.

सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, दशरथ बुरकूल, बीट जमादार अजीज शेख, गोपनीय विभागाचे मनोज वैद्य यांनी घटनास्थळी दाखल होऊन गावात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा;

Back to top button