औरंगाबाद : पिंपळदरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ शेळ्या ठार; परिसरात भीतीचे वातावरण ; | पुढारी

औरंगाबाद : पिंपळदरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ शेळ्या ठार; परिसरात भीतीचे वातावरण ;

अजिठा; पुढारी वृत्तसेवा सिल्लोड तालुक्यात पिंपळदरी शिवारातील गट १४ मधील शेतातील गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. बिबट्याने गोठ्यात शिरून यातील तीन शेळ्यांवर हल्‍ला करत, त्‍यांचा फडशा पाडला. ही घटना (शुक्रवार) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले. सदर घटनेने पशू पालकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळदरी येथील शेतकरी सुभाष सोनाजी शिरसाट यांच्या शेतातील गट नं १४ मध्ये जनावरांचा गोठा आहे. गोठ्यामध्ये तीन शेळ्या नेहमी प्रमाणे बांधलेल्या होत्या. या गोठ्यात शिरुन तीन शेळ्यांवर बिबट्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून त्यांना ठार केले.

नेहमीप्रमाणे आज (शनिवार) सकाळी गोठ्यात शेळ्या सोडण्यासाठी गेले असता, त्यांना गोठ्यापासून दाहा फूट अंतरावर एक शेळी मृतवस्थेत आढळून आली. मात्र दोन शेळ्या बिबट्याने उचलून नेल्याचे दिसले. यात सुभाष शिरसाट यांचे अंदाजे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. दरम्‍यान या घटनेमुळे स्‍थानिक रहिवांशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : 

Back to top button