Raosaheb danve : 'मुख्यमंत्र्यांनी मला कानात सांगितले काँग्रेसवाले मला त्रास देतात' : रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे | पुढारी

Raosaheb danve : 'मुख्यमंत्र्यांनी मला कानात सांगितले काँग्रेसवाले मला त्रास देतात' : रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : व्यासपीठावरील आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी… असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात भाषणाची सुरवात केली. यावरून राज्यात नवे राजकीय वळण आल्याचे बोलले जात आहे. यावेळी केंद्रीय रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्याबाबत मोठे विधान केले आहे. (Raosaheb danve)

मुख्यमंत्री ठाकरे भर सभेत मला म्हणाले, काँग्रेसवाले मला त्रास देतात..तुम्ही एकत्र या आपण बसून बोलू आणि हे सांगताना व्यासपीठावर बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. त्यांनीही हे ऐकलं आणि तेही हसले, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे (Raosaheb danve) यांनी दिली आहे.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या कामासाठी हे सरकार सोबत असल्याचे सांगत, रेल्वेचा मार्ग आधीच ठरलेला असतो. रूळ सोडून इंजिन इकडे-तिकडे कुठेही जावू शकत नाही. म्हणून मला रेल्वे आवडते. मध्ये डायव्हरशन पाहिजे तर आमच्या स्टेशनवर येवू शकता. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या जुन्या मित्राला साद घातली. शुक्रवारी (दि.17) झालेल्या जिल्हा परिषदच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

तर हे सरकार तुमच्या पाठीशी

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेनच्या कामाचा उल्लेख केला. हा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनीही त्यांना साथ देण्याचे आश्वासन दिले. रावसाहेब, तुम्ही मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी तुम्ही पुढाकार घेत असाल, तर हे सरकार तुमच्या सोबत प्रत्येक पावलावर उभे राहील.

देशातील बुलेट ट्रेनचा पहिला मार्ग हा अहमदाबाद-मुंबई होत आहे, पण त्यापेक्षा माझ्या राज्याची राजधानी (मुंबई) आणि उपराजधानी (नागपूर) जोडणारा लोहमार्ग व्हावा, अशी आमची इच्छा अशी होती.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या बरोबरीने मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल, तर मी तुमच्या सोबत आहे. हीच कामाची एक पद्धत असली पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असले पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिवेसनेचे बोट धरूनच भाजप महाराष्ट्रात वाढली, सत्तेच्या ध्येयाकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवसेना ही रूळ आहे, असे संकेतच त्यांनी यातून दिल्याचे बोलले जात आहे.

आम्ही पुन्हा हातात हात घालायला तयार

भाजप आणि शिवसेना हे पूर्वीचे मित्र होते. पण शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत यांची आघाडी झाली. असे जरी झाले असले तरी शिवसेनेने तयारी दाखवल्यास भाजप शिवसेनेच्या कायम सोबत असणार असे केंद्रिय मंत्री दानवे म्हणाले.

Back to top button