औरंगाबाद शहरात शिवसेनेकडून राष्ट्रवादीला दे धक्का! | पुढारी

औरंगाबाद शहरात शिवसेनेकडून राष्ट्रवादीला दे धक्का!

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मंगळवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घेण्यात आला. त्यामुळे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी मिशन महापालिका सुरु केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्ह्यात अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य व्यक्ती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे काम करण्यास इच्छूक आहे. त्यात राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांचा समावेश होता. म्हणून हा प्रवेश सोहळा झाल्याचे तनवाणी यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी मध्य मतदारसंघ शहराध्यक्ष फेरोज कुरेशी, उपाध्यक्ष दिलीप शिरसाट, वार्ड अध्यक्ष शेख मकसूद, बाबर कुरेशी, कैलास काशीकर, लक्ष्मण चव्हाण, अजहर कुरेशी, गफार कुरेशी, फैज कुरेशी, मनोज देशमुख आदींनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा  

सातारा : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 382 अर्ज

पुणे : 1208 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ; ग्रामपंचायत निवडणुकांमुळे निर्णय

औरंगाबाद : पदवीधर अधिसभा निवडणुकीसाठी पहिल्या चार तासात केवळ १५ टक्के मतदान

 

 

 

Back to top button